शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

तुम्ही घर बांधणार आहात? मग ग्रीन होम्सचा विचार करा....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 4:57 PM

'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो.

मुंबई- तुम्ही घर घेण्याचा विचार करत आहात का?  मग ग्रीन होम्सचाही विचार करायला हरकत नाही. आता ग्रीन होम्स म्हणजे नक्की काय ते आधी पाहू.

हे विश्वची माझे घर ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. हवा, सूर्यप्रकाश ही निसर्गाने दिलेली देणगी घरांसाठी मुबलक वापरायची आणि प्रदूषण कमीत कमी करायचे असा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. ही झाली ढोबळ व्याख्या. पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये त्याची वेगवेगळी व्याख्या केल्याचेही दिसून येते. ग्रीन होम्स ही आपल्या नेहमीच्या बांधकामापेक्षा शाश्वत टिकणाऱ्या साधनांच्या मदतीने वापरलेली आणि कमीतकमी ऊर्जा वापरून बांधलेली असतात.

ग्रीन होम्स कशासाठी?- घरोघरी होणारा वीज आणि पाणी यांचा वापर आपल्या खिशावर परिणाम करत असतो. उन्हाळा आला की वीजेचं बिल वाढतं. वीज ही भरपूर वापरली जाते. घरांची दारं-खिडक्या बंद होऊन वातानुकूलन यंत्रणा म्हणजेच एसी सुरु केले जातात. यामुळे खर्चही वाढतो. मात्र ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला जातो. या नव्या यंत्रणेमध्ये सौर ऊर्जेचा वापर करुन तयार झालेली वीज वापरली जाते. रेन वॉटर हार्वेस्टींग करुन भूजल पातळी वाढवली जाते. पावसाचे पाणी वाचवून त्याचा उपयोग दैनंदिन वापरासाठी केला जातो. यामुळे तुमच्या वीजेच्या बिलावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यात 20 ते 30 टक्के कपात होऊ शकते.

आरोग्यासाठी काय फायदा?- ग्रीन होम्समध्ये नैसर्गिक साधनांचा जास्त वापर केल्यामुळे हवेशिर आणि उत्तम प्रकाशव्यवस्थेची योजना केलेली असते. नैसर्गिक हवेचा उपयोग, हवा शुद्धीकरणासाठी नैसर्गिक उपायांचा वापर, झाडांचा अधिकाधिक वापर, खिडक्यांमधून प्रकाश जास्त यावा अशी केलेली योजना, सौर चिमणी, एक्झॉस्ट फॅनचा वापर, नैसर्गिक रंगांचा वापर यामुळे तुमचे राहणीमान आरोग्यवर्धक होते.

उत्तम जीवनशैली- इको फ्रेंडली वस्तूंचा वापर घरामध्ये केल्यामुळे तुमची जीवनपद्धती निसर्गाशी एकदम पूरक होते. उदाहरणार्थ ग्रीन होम्समध्ये बांबू, पुनर्वापर केलेले धातूचे सुटे भाग, क्ले प्लॅस्टर, इको फ्रेंडली फर्निचर, बांबूचे फर्निचर, फिक्या रंगाची अंतर्गत सजावट केल्यामुळे एकूण जीवनशैली सुधारते.

टॅग्स :HomeघरReal Estateबांधकाम उद्योगGreen Planetग्रीन प्लॅनेट