शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, अमित शाहांनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 22:11 IST

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या संसदीय दलाची बैठक झाली.

नवी दिल्लीः संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे. सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या संसदीय दलाची बैठक झाली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह आणि अर्जुन राम मेघवालही उपस्थित होते. त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू झालं असून, काँग्रेस खासदारांनी मोठा गदारोळ केला. काँग्रेसनं एसपीजीच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अमित शाहांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.गांधी कुटुंबीयांनाच एसपीजीची सुरक्षा का पाहिजे?, असा प्रतिप्रश्नही अमित शाहांनी उपस्थित केला. दुसरीकडे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींच्या घरी एक घटना घडली. तेव्हा राहुल गांधी घरी भेटण्यासाठी येणार होते. राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि सोनिया गांधींची प्रियंका गांधींच्या घरी पोहोचल्यानंतर कोणतीही चौकशी होत नसते, त्यादरम्यान काळ्या रंगातील एक सफारी गाडी प्रियंका गांधींच्या घरी घुसून गाडीतून काँग्रेसचा एक नेता उतरला आहे. राहुल गांधी येणार असतात, त्याच वेळी तो नेता गाडीतून उतरतो. या प्रकरणात तीन सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. तसेच उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत, असंही अमित शाहांनी स्पष्ट केलेलं आहे.सरकारनं गांधी कुटुंबीयांची सुरक्षा परत घेतलेली नाही. फक्त त्यात बदल केलेला आहे. जी संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतींना मिळाली आहे, तीच त्यांना परत देण्यात आली आहे. कम्युनिस्ट पार्टीला राजकीय बदलावर  बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. केरळमध्ये भाजपा आणि आरएसएसच्या 120हून अधिक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. हा फक्त राजकीय बदलच आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शहा