तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:54 IST2021-05-13T08:53:44+5:302021-05-13T08:54:17+5:30
वय वर्षे ३० ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे

तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका तरुणाईला बसला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचा जास्त समावेश आहे. तरुणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पटकन लक्षात येत नसल्याने हे असे होत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे.
आयसीएमआरच्या मते
कोरोनाच्या नियंत्रणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी तरुणांमध्ये संसर्ग वाढण्याची २ कारणे दिली आहेत.
कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग झाला दुसरे कारण म्हणजे देशात कोरोनाचे अनेक व्हेरिएंट्स सध्या कार्यरत असून त्यांचा प्रादुर्भाव तरुणाईला मोठ्या प्रमाणात झाला आहे
धोका असलेला वयोगट
- कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसंदर्भातील जो काही डेटा उपलब्ध आहेे त्यानुसार बाधितांच्या वयोमानात फारसा फरक नाही
- वय वर्षे ३० ते ४० वयोगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे निदर्शनास आले आहे