लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींनी सही का केली नाही? काँग्रेसने सांगितलं कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:47 IST2026-02-10T14:46:16+5:302026-02-10T14:47:16+5:30

No-Confidence Motion Against The Lok Sabha Speaker: विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह १२० खासदारांनी सह्या केल्या आहेत. मात्र या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सही केलेली नाही. यामागचं कारण आता काँग्रेसने सांगितलं आहे. 

Why didn't Rahul Gandhi sign the no-confidence motion against the Lok Sabha Speaker? Congress explained the reason | लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींनी सही का केली नाही? काँग्रेसने सांगितलं कारण  

लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींनी सही का केली नाही? काँग्रेसने सांगितलं कारण  

लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कमालीचं वादळी ठरत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावादरम्यान, राहुल गांधी यांना माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मुद्दे मांडण्यापासून रोखण्यात आल्यापासून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपा आणि लोकसभा अध्यक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह १२० खासदारांनी सह्या केल्या आहेत. मात्र या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सही केलेली नाही. यामागचं कारण आता काँग्रेसने सांगितलं आहे.

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी यांनी सही न करण्यामागचं कारण सांगताना काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, संसदीय लोकशाहीची गरिमा विचारात घेता विरोधी पक्ष नेत्याने लोकसभा अध्यक्षांविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीवर सही करणे योग्य ठरले नसते.

विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटिस लोकसभेच्या सरचिटणीसांकडे सोपवण्यात आल्यानंतर ओम बिर्ला यांनी स्वत:ला सभागृहाच्या कामकाजापासून दूर केले आहे. तसेच आज सकाळपासून ते सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहात आलेले नाहीत. 

Web Title : राहुल गांधी ने अविश्वास प्रस्ताव पर हस्ताक्षर क्यों नहीं किए: कांग्रेस का स्पष्टीकरण

Web Summary : राहुल गांधी ने लोकसभा अध्यक्ष के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पर हस्ताक्षर नहीं किए। कांग्रेस सूत्रों का कहना है कि यह संसदीय गरिमा बनाए रखने के लिए है क्योंकि नेता प्रतिपक्ष का हस्ताक्षर अनुचित है।

Web Title : Why Rahul Gandhi Didn't Sign No-Confidence Motion: Congress Explains

Web Summary : Rahul Gandhi didn't sign the no-confidence motion against the Lok Sabha Speaker. Congress sources say it's to uphold parliamentary dignity, as opposition leader signature is inappropriate.