युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:59 IST2025-05-14T19:56:06+5:302025-05-14T19:59:10+5:30

जयराम रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. पण आता त्याचे राजकारण केले जात आहे.

Why did Trump announce the ceasefire first? Congress questions PM Modi | युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या युद्धविरामाबाबत बुधवारी काँग्रेसची एक मोठी बैठक झाली. यानंतर, पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, "गेल्या २० दिवसांत काँग्रेसची ही तिसरी मोठी बैठक आहे. यामध्ये काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनीही सहभाग घेतला आहे. २२ एप्रिलपासून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी वारंवार ऐक्य आणि एकतेबद्दल बोलत आहेत. त्यांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आणि ऑपरेशन सिंदूरचे स्वागत केले. राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष म्हणाले की, आम्ही सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही दहशतवाद आणि पाकिस्तानविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईला पाठिंबा देत आहोत. आमच्या दोन सर्वपक्षीय बैठका झाल्या. दोन्ही बैठकांना पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. ही सर्वपक्षीय बैठक औपचारिकतेसाठी आयोजित करण्यात आली होती. राहुल गांधी आणि खरगे यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. युद्धविरामाची पहिली घोषणा ट्रम्प यांनी का केली? पंतप्रधान मोदी यावर काहीही बोलत नाहीत."

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश पुढे म्हणाले की, "अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणतात की, चर्चा तिसऱ्या ठिकाणी व्हायला हवी. पंतप्रधानही यावर काहीही बोलत नाहीत. आपले परराष्ट्र मंत्री जगाच्या विविध मुद्द्यांवर बोलत राहतात, प्रवचने देत राहतात, पण त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. विरोधकांना विश्वासात का घेतले जात नाही? राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नेहमी ऐक्याबद्दल बोलतात."

काँग्रेस 'जय हिंद' सभा आयोजित करणार!
जयराम रमेश म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. पण आता त्याचे राजकारण केले जात आहे. याचे श्रेय घेण्यासाठी राजकारण सुरू आहे. आम्ही देशातील सुमारे एक डझन शहरांमध्ये 'जय हिंद' सभा आयोजित करू आणि जनतेच्या वतीने सरकारला प्रश्न विचारू. या संदर्भात राहुल गांधी शुक्रवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहेत.

Web Title: Why did Trump announce the ceasefire first? Congress questions PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.