पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:25 IST2025-06-06T15:20:05+5:302025-06-06T15:25:54+5:30

रिमांडदरम्यान दोघांकडून काही अतिशय धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली असून, महिलांचा हेरगिरीसाठी वापर का करण्यात येत होता, हेही उघड झाले आहे.

Why did Pakistan choose women for espionage or Spying Traitors Tufail and Haroon revealed this during interrogation! | पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!

पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!

उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले दोन आरोपी, वाराणसीचा तुफैल आणि दिल्लीतून अटक केलेला हारून यांच्या रिमांडचा कालावधी संपला आहे. रिमांडदरम्यान दोघांकडून काही अतिशय धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली असून, महिलांचा हेरगिरीसाठी वापर का करण्यात येत होता, हेही उघड झाले आहे.

पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाशी थेट संपर्क!
यूपी एटीएसच्या सूत्रांनुसार, तुफैल आणि हारून दोघांनीही पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या 'मुज्जामिल' नावाच्या अधिकाऱ्याशी थेट संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. मुज्जामिलकडून त्यांना स्पष्ट निर्देश मिळाले होते की, हेरगिरीसाठी महिलांना स्लीपर सेलमध्ये सामील करून घ्या.

महिलांचा वापर करण्याचं कारण काय?
तपासादरम्यान, एटीएसने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दोघांनी कबूल केले की, सुरक्षा यंत्रणांकडून महिलांवर सहज संशय घेतला जात नाही, म्हणून त्यांचा वापर ‘सुरक्षित पर्याय’ म्हणून केला जात होता. त्यांना थेट हेरगिरीच्या हेतूची माहिती दिली जात नव्हती; त्याऐवजी विशिष्ट ठिकाणी माहिती पुरवण्याचे, फोटो-व्हिडीओ पाठवण्याचे किंवा एक्झिक्युशनसाठी विशिष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले जात होते.

हेरगिरीच्या नव्या मॉड्यूलचा ब्लूप्रिंट
तुफैल आणि हारून यांनी चौकशीदरम्यान हेरगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या मॉड्यूलचा संपूर्ण आराखडा (ब्लूप्रिंट) एटीएसला दिला. यात महिलांना सुरुवातीला सामाजिक काम, डेटा संकलन अशा नावाखाली जोडले जात होते. मात्र, काही महिलांना जेव्हा हेरगिरीचा संशय आला, तेव्हा त्यांनी सहभाग घेण्यास नकार दिला.

पैशांच्या ट्रान्सफरचा शोध
हारूनने हेरगिरीच्या कामासाठी वापरलेले पैसे कोणत्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले गेले, याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत तीन बँक खात्यांची माहिती एटीएसच्या हाती लागली असून, संबंधित खातेदारांचा शोध घेतला जात आहे. सध्या तुफैल आणि हारून यांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, यूपी पोलीस त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलांची ओळख पटवण्याचा आणि कोणत्या जिल्ह्यांतील महिला यात सामील आहेत हे तपासण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Why did Pakistan choose women for espionage or Spying Traitors Tufail and Haroon revealed this during interrogation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.