26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 09:46 AM2021-11-26T09:46:18+5:302021-11-26T09:46:34+5:30

संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करणे हा आहे.

Why Constitution Day is celebrated on 26th November? Get to know some important things about it | 26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

26 नोव्हेंबरला संविधान दिन का साजरा करतात? जाणून घ्या त्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

Next

26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन(Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.

26 नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे कारण म्हणजे 1930 मध्ये काँग्रेस लाहोर परिषदेने पूर्ण स्वराजची प्रतिज्ञा पास केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

संविधान बनवायला इतके दिवस लागले

संविधान बनवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे पूर्णपणे तयार झाले. भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. संविधानाची मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती. हे उत्कृष्ट कॅलिग्राफीद्वारे इटॅलीक अक्षरात लिहिलेले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आल्या होत्या. आजही भारताच्या संसदेत त्या सुरक्षितपणे ठेवल्या आहेत. 

संविधानाचा उद्देश

देशात राहणार्‍या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता, समानता असावी आणि सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत म्हणून संविधान बनवले गेले. भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना लिहिली गेली आहे, ज्याला भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावना पत्र म्हणतात. या प्रस्तावनेत, ते भारतातील सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता सुरक्षित करते आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवते.
 

Web Title: Why Constitution Day is celebrated on 26th November? Get to know some important things about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app