आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 05:59 IST2025-08-29T05:53:31+5:302025-08-29T05:59:14+5:30
Lok Sabha Election: गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट झालेल्या विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांची जबरदस्त कोंडी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर
गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली एकजूट झालेल्या विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांची जबरदस्त कोंडी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्यास एनडीएला ३२४ जागा मिळू शकतात. तर भाजपालाही गेल्या निवडणुकीत मिळालेल्या २४० जागांमध्ये वाढ होऊन हा आकडा २६० पर्यंत पोहोचू शकतो. मात्र भाजपाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही.
इंडिया टुडे आणि सी-वोटर यांनी केलेल्या या सर्वेमधून ही आकडेवारी समोर आली आहे. हा सर्वे देशातील सर्व राज्ये आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये १ जुलै ते १४ ऑगस्ट यादरम्यान करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये सुमारे २ लाख ६ हजार ८२६ जणांचं मत विचारण्यात आलं होतं. या सर्वेमध्ये ३ ते ५ टक्क्यांचा मार्जिन एरर असू शकतो.
दरम्यान, या सर्वेनुसार आज लोकसभेची निवडणूक झाल्यास एनडीएला ३२४ जागा मिळू शकतात. तक इंडिया आघाडीला २०८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात ११ जागा जातील. २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला २९३ तर इंडिया आघाडीलाा २३४ जागा मिळाल्या होत्या. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये एनडीएला ३४३ जाहा मिळण्याचा तर इंडिया आघाडीला १८८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास एनडीएला ४६.७ टक्के तर इंडिया आघाडीला ४०.९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात १२.४ टक्के मतं जाऊ शकतात.
पक्षनिहाय जागांचा विचार करायचा झाल्यास या सर्वेनुसार भाजपाला २६०, काँग्रेसला ९७ आणि इतरांना १८६ जागा मिळू शकतात. तर मतदानाच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ४०.६ टक्के, तर काँग्रेसला २०.८ टक्के मतं मिळू शकतात. इतरांना ३८.६ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.