Tripura CM submitted resignation : बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार त्रिपुराचा नवा CM? या नेत्यांची नावं शर्यतीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 06:30 PM2022-05-14T18:30:20+5:302022-05-14T18:33:10+5:30

बिप्लब कुमार देब हे 2016 साली त्रिपुरा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष झाले. यानंतर, 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले होते.

Who will be the new CM of Tripura after the resignation of Biplab Deb The names of these leaders are in the race | Tripura CM submitted resignation : बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार त्रिपुराचा नवा CM? या नेत्यांची नावं शर्यतीत 

Tripura CM submitted resignation : बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार त्रिपुराचा नवा CM? या नेत्यांची नावं शर्यतीत 

Next

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देब यांनी शनिवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर आता त्रिपुराचे उपमुख्यमंत्री (Tripura Deputy CM) जिष्णु देव वर्मा (Jishnu Dev Varma), माणिक साहा आणि त्रिपुराच्या पहिल्या केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे.

बिप्लब कुमार देब हे 2016 साली त्रिपुरा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष झाले. यानंतर, 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले होते. या निवडणुकीत त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात, 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारचा पराभव केला होता. 

नव्या मुख्यमंत्रीपदासाठी हालचालींना वेग -
बिप्लब कुमार यांच्या राजीनाम्यानंतर, नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. या बैठकीत त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्राची निवड करण्यात येईल. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडेही उपस्थित असतील. या दोघांची निवड केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली आहे. दोघेही अगरताळ्याला पोहोचले आहेत.
 

Web Title: Who will be the new CM of Tripura after the resignation of Biplab Deb The names of these leaders are in the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.