मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा 'तो' फिजिओथेरपिस्ट नव्हे, तर बलात्कारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:42 IST2022-11-23T06:41:08+5:302022-11-23T06:42:57+5:30

जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवा खुलासा पुढे आला आहे.

who massaged Minister Satyendar Jain was not a physiotherapist but a rapist | मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा 'तो' फिजिओथेरपिस्ट नव्हे, तर बलात्कारी

मंत्री सत्येंद्र जैन यांची मसाज करणारा 'तो' फिजिओथेरपिस्ट नव्हे, तर बलात्कारी

नवी दिल्ली : दिल्लीच्या तुरुंगात असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांना मसाज करताना व्हिडीओ फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून बलात्काराच्या प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेला कैदी आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.

जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवा खुलासा पुढे आला आहे. कथित व्हिडीओंमध्ये जैन त्यांच्या सेलमध्ये पाठीमागे आणि पायाची मालिश करताना, काही कागदपत्रे वाचताना आणि बेडवर झोपताना पाहुण्यांशी बोलताना दिसत होते. मिनरल वॉटरच्या बाटल्या आणि रिमोटही दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये ते खुर्चीवर बसून डोक्याची मालिश करून घेताना दिसतात. 

Web Title: who massaged Minister Satyendar Jain was not a physiotherapist but a rapist