शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 06:16 IST2025-05-11T06:14:02+5:302025-05-11T06:16:45+5:30

युद्धाच्या सुरुवातीपासून ते युद्धबंदी आणि संघर्ष वाढवण्यापर्यंत आणि कमी करण्यापर्यंत युद्धाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

who is the dgmo and who negotiated the ceasefire a ceasefire solution through discussions on the india pakistan conflict | शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजेच 'डीजीएमओ'मधील चर्चेनंतरच हे शक्य झाले.

डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्स महासंचालक हे सैन्यातील महत्त्वाचे पद आहे. सध्या भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई आहेत. सर्व लष्करी ऑपरेशन्स ही डीजीएमओची जबाबदारी आहे. डीजीएमओ सीमा संबंधित मुद्दे, लष्करी कारवाया आणि इतर समस्यांचे व्यवस्थापन करतात. म्हणूनच, युद्धाच्या सुरुवातीपासून ते युद्धबंदी आणि संघर्ष वाढवण्यापर्यंत आणि कमी करण्यापर्यंत युद्धाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

डीजीएमओचे कार्य काय?

युद्ध किंवा संघर्षादरम्यान लष्करी ऑपरेशन्सशी संबंधित प्रत्येक निर्णय डीजीएमओ घेतात. डीजीएमओचे काम युद्ध किंवा दहशतवादविरोधी ऑपरेशन्स आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांसाठी रणनीती तयार करणे आहे. यासोबतच, ते सैन्याच्या तिन्ही शाखा आणि विविध एजन्सींमधील समन्वयक म्हणूनही काम करतात.

लष्करी कारवायांचे व्यवस्थापन कसे होते? ते कोण करते?

युद्ध किंवा लष्करी ऑपरेशन्सशी संबंधित प्रत्येक माहिती डीजीएमओकडे पाठवली जाते. ते त्यानुसार रणनीती तयार करतात आणि ऑपरेशन्स करतात. यामुळे, त्याला गुप्तचर संस्थांशी समन्वय साधावा लागतो. सर्व आवश्यक माहिती डीजीएमओला पाठवणे एजन्सींना बंधनकारक आहे.
 

Web Title: who is the dgmo and who negotiated the ceasefire a ceasefire solution through discussions on the india pakistan conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.