कोण आहे श्रीनिवास लुईस? ज्यानं देशातील ११०० न्यायालयांना दिली बॉम्बनं उडवण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:28 IST2026-04-02T15:26:15+5:302026-04-02T15:28:07+5:30

Who is Srinivas Louis: देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खळबळ उडवून देणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

Who is Srinivas Lewis? The one who threatened to blow up 1100 courts in the country! | कोण आहे श्रीनिवास लुईस? ज्यानं देशातील ११०० न्यायालयांना दिली बॉम्बनं उडवण्याची धमकी!

कोण आहे श्रीनिवास लुईस? ज्यानं देशातील ११०० न्यायालयांना दिली बॉम्बनं उडवण्याची धमकी!

देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खळबळ उडवून देणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रीनिवास लुईस (वय, ४७) असे या आरोपीचे नाव असून, तो कर्नाटकच्या म्हैसूर येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने म्हैसूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर सेल करत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली उच्च न्यायालय, बिहारमधील पाटणा न्यायालय आणि देशातील इतर १००० पेक्षा जास्त न्यायालयांना बॉम्बने उडवण्याचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले. या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे दिल्ली पोलिसांनी म्हैसूरमधील वृंदावन लेआउट परिसरात छापा टाकून आरोपी श्रीनिवासला ताब्यात घेतले असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

श्रीनिवास लुईस हा पदव्युत्तर असून त्याने UGC-NET ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. तो काही काळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. तपासात समोर आले आहे की, श्रीनिवासला वकील बनायचे होते. वडिलांच्या जमिनीचा वाद सोडवण्यासाठी त्याने २०१६ मध्ये एलएलबीला प्रवेश घेतला होता. परंतु, तो पदवी पूर्ण करू शकला नाही. या अपयशामुळे आणि बेरोजगारीमुळे तो मानसिक तणावात होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण न झाल्याने आणि जमिनीचा प्रश्न मार्गी न लागल्याने त्याचा न्यायव्यवस्थेवर राग होता. याच रागातून त्याने न्यायालयांना लक्ष्य करून भीती पसरवण्यासाठी हे ईमेल पाठवले.

आरोपीकडून लॅपटॉपसह अनेक बनावट सिमकार्ड जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने केवळ भारतातील न्यायालयांनाच नाही. तर, आपल्या ईमेलमध्ये पाकिस्तानचाही उल्लेख केला होता. तो परदेशी सर्व्हरचा वापर करून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि अनेक बनावट सिमकार्ड जप्त केली आहेत.

Web Title : भारतीय न्यायालयों को बम से उड़ाने की धमकी देने वाला गिरफ्तार

Web Summary : मैसूर के श्रीनिवास लुईस को 1100 से अधिक भारतीय न्यायालयों को बम से उड़ाने की धमकी देने के आरोप में गिरफ्तार किया गया। कानूनी पढ़ाई में विफलता और भूमि विवादों से निराश होकर उसने न्यायपालिका को निशाना बनाया। पुलिस ने एक लैपटॉप और नकली सिम कार्ड जब्त किए।

Web Title : Man Arrested for Bomb Threats to Indian Courts: Details

Web Summary : Srinivas Louis, a highly educated man from Mysore, was arrested for sending bomb threats to over 1100 Indian courts. Frustration over failed legal studies and land disputes fueled his anger, leading him to target the judiciary. Police seized a laptop and fake SIM cards.