5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:35 IST2025-11-13T16:34:41+5:302025-11-13T16:35:24+5:30
डॉ. आदिलचा निकाह अथवा लग्न गेल्या हिन्याच्या 4 ऑक्टोबरला काश्मीरमध्ये झाले होते. त्याने डॉ. बाबर, डॉ. असलम सैफी आणि इतर चार मुस्लिम डॉक्टरांना निमंत्रण दिले होते. मात्र, रुग्णालयाचे संचालक डॉ. मनोज मिश्रा यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते...

5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून डॉ. आदिल अहमदला अटक करण्यात आल्यानंतर, देशातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता डॉक्टर आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सर्व जण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यने दिलेल्या माहितीनुसार, या पाहुण्यांची यादी तयार केली जात असून लवकरच त्यांची चौकशी होऊ शकते.
पाच लाख रुपये मासिक पगार घेणाऱ्या या डॉक्टरला लग्नानंतर काही दिवसांतच अटक करण्यात आली. यानंतर त्याचे काश्मीरमधील लग्न, उपस्थित पाहुणे, निकाह कार्ड आणि सर्जन असलेली त्याची पत्नी रुकैया हे सर्वच तपासाच्या कक्षेत आले आहेत.
डॉ. आदिलचा निकाह अथवा लग्न गेल्या हिन्याच्या 4 ऑक्टोबरला काश्मीरमध्ये झाले होते. त्याच्या निकाहाची पत्रिकाही समोर आली असून, त्याने डॉ. बाबर, डॉ. असलम सैफी आणि इतर चार मुस्लिम डॉक्टरांना निमंत्रण दिले होते. मात्र, रुग्णालयाचे संचालक डॉ. मनोज मिश्रा यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.
आदिल सहारनपूरच्या अंबाला रोडवरील फेमस मेडिकेअर रुग्णालयात कार्यरत होता. तो लग्नाची सुट्टी घेऊन काश्मीरला गेला होता. त्याच्या निकाहला काही डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारीही उपस्थित होते. या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
डॉ. आदिलची महिन्याची सॅलरी पाच लाख रुपये -
माध्यमांतील वृत्तांनुसार, डॉ. आदिलने 2024 मध्ये दिल्ली रोडवरील ऑस्कर रुग्णालयात काम केले होते, जिथे त्याची भेट डॉ. अंकुर चौधरी यांच्याशी झाली. त्यांच्याद्वारेच त्याची ओळख डॉ. मनोज मिश्रा यांच्याशी झाली. यानंतर, त्याची फेमस मेडिकेअर रुग्णालयात पाच लाख रुपये मासिक पगारावर नेमणूक करण्यात आली होती.
कोण आहे डॉक्टर रुकैया...?
लग्नानंतर तो 1 नोव्हेंबर रोजी सहारनपूरला परतला आणि पत्नी रुकैयासह हनिमूनला जाण्याची तयारी करत असतानाच, 6 नोव्हेंबरला पोलिसांनी त्याला अटक केली. डॉ. आदिलचा भाऊदेखील डॉक्टर असून त्याची पत्नी डॉ. रुकैया सर्जन आहे. तो काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वानपुरा गावचा रहिवासी असून श्रीनगर मेडिकल कॉलेजमधून त्याने एमबीबीएस केले आहे.