शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:03 IST

ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे. तपासात या संघटनेशी तीन डॉक्टर जोडले गेले

जम्मू-काश्मीर पोलिसांनी एनसीआरमधील फरीदाबाद येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी ३५० किलो स्फोटक, दोन ए.के.-४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. ही कारवाई काश्मिरी डॉक्टर आदिल अहमद राठर याच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली. तसेच, राठरने काश्मीर खोऱ्यातील आपल्या लॉकरमध्येही ए.के.-४७ रायफल आणि काही दारुगोळा ठेवला होता. त्याने एक खोली भाड्याने घेतली होती. त्यात शस्त्रे आणि स्फोटके ठेवण्यात आली होती, असेही तपासात उघड झाले आहे. आता हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवले जाऊ शकते.

ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे. तपासात या संघटनेशी तीन डॉक्टर जोडले गेले असल्याचे समोर आले आहे. त्यांपैकी अनंतनागचा आदिल राठर आणि पुलवामाचा मुजम्मिल शकील या दोघांना प्रत्येकी सहारनपूर आणि फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या डॉक्टरचा शोध सुरू आहे.

खोऱ्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी स्फोटक जप्ती -गेल्या दोन दिवसांपूर्वी अनंतनाग मेडिकल कॉलेजमधील आदिल राठरच्या लॉकरमधून ए.के.-४७ रायफल सापडली होती. अटक करण्यात आलेले दोन्ही डॉक्टर सध्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, ही खोऱ्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठी स्फोटक जप्ती असून तपास अद्यापही सुरूच आहे.

कोण आहे आदिल -आदिल राठर हा अनंतनागचा रहिवासी असून सहारनपूरच्या अंबाला रोडवरील खासगी रुग्णालयात मेडिसिन तज्ज्ञ म्हणून कार्यरत होता. त्याने अलीकडेच सहारनपूरच्या एका महिला डॉक्टरशी निकाह केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावल्याने तणाव निर्माण झाला होता. तरम्यान या प्रकरणात अधिकाऱ्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर स्थानिक गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's revelations lead to huge explosives, AK-47 seizure.

Web Summary : Jammu-Kashmir police seized 350 kg explosives and AK-47s based on doctor Adil Rathar's information. He hid weapons in a rented room. Rathar and another doctor are arrested; a third is sought. It's a major explosives seizure linked to the AGH terror group.
टॅग्स :TerrorismदहशतवादPoliceपोलिसterroristदहशतवादी