आज लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस होता. मात्र हा दिवसही गदारोळातच गेला. विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. यानंतर, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. राहुल गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. यानंतर, विरोधी खासदारांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान, सुरू असलेल्या प्रचंड गदारोळ एका खासदाराने चेअरला थेट 'यार' म्हणून संबोधले. यावरून उपसभापती अधिकच भडकले.
उपसभापती भडकले म्हणाले... - खरे तर आज (३ फेब्रुवारी) लोकसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. दुपारी ३ वाजता सभागुरू पुन्हा सुरू झाले. यावेळी उपसभापती कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी सदस्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. दरम्यान, गदारोळ सुरू असतानाच एक सदस्य चेअरला 'यार' म्हणून संबोधित करत होता. यावर उपसभापती भडकले आणि म्हणाले, "आपण काय म्हणालात? 'हे काय आहे यार'... ही संसद आहे, लोकसभा आहे. तुम्ही चेअरला 'यार' म्हणू शकत नाही." ही टिप्पणी राहुल गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे इशारा करत करण्यात आल्यचाे समजते. यामुळे सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला.
८ खासदार निलंबित - यानंतर, कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र, अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावल्याप्रकरणी ८ खासदारांवर कठोर कारवाई करत त्यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. यांत, काँग्रेसचे ७ खासदार अमरिंदर सिंग राजा वडिंग, प्रशांत परोले, हिबी ईडन, गुरजीत औजला, डीन कुरियाकोस, मणिकम टागोर, किरण कुमार रेड्डी यांचा समावेश आहे, तर माकपचे खासदार एस. व्यंकटेशन यांचा समावेश आहे.
Web Summary : Lok Sabha adjourned after uproar over a member calling the Chair 'yaar'. Deputy Speaker rebuked the comment. Eight MPs suspended for misconduct during the session.
Web Summary : लोकसभा में एक सदस्य द्वारा अध्यक्ष को 'यार' कहने पर हंगामा हुआ। उपाध्यक्ष ने फटकार लगाई। सत्र के दौरान दुर्व्यवहार के लिए आठ सांसद निलंबित।