धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:55 PM2021-05-27T12:55:39+5:302021-05-27T13:03:16+5:30

संबंधित  महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या आतड्यांत छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची चार तास सर्जरी करण्यात आली.

White fungus intestine case in sir ganga ram hospital Delhi | धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे महिलेच्या आतड्यांना पडले छिद्र, देशात आढळली जगातील पहिलीच केस

Next

नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीने हात-पाय पसरले असतानाच आता ब्लॅक आणि व्हाइट फंगसमुळेही चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीत व्हाइट फंगसचे (White fungus) एक प्रकरण समोर आले आहे. यात फंगसमुळे एका महिलेच्या आतड्यांना छिद्रे पडल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच प्रकरण आहे. (White fungus intestine case in sir ganga ram hospital Delhi)

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. रुग्णालयाने म्हटले आहे, 49 वर्षांच्या एक महिलेला 13 मे 2021 रोजी सर गंगाराम रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये आणण्यात आले होते. तेव्हा या महिलेच्या पोटात अत्यंत वेदना होत होत्या. तसेच त्या उलट्यांसह बद्धकोष्ठतेमुळेही त्रस्त होत्या. एवढेच नाही, तर संबंधित महिला कॅन्सरनेही पीडित होती, तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांची केमोथेरेपीही झाली होती.

Mucormycosis : ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसच्या लक्षणांमध्ये काय फरक असतो? वेळीच जाणून घ्या अन् तब्येत सांभाळा

संबंधित  महिलेचे रुग्णालयात सीटी स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यांच्या आतड्यांत छिद्रे असल्याचे दिसून आले. यानंतर त्या महिलेची चार तास सर्जरी करण्यात आली. यात या महिलेच्या अन्न नलिका, छोटे आतडे तथा मोठ्या आतड्यांन पडलेली छिद्रे बंद करण्यात आली. तसेच द्रव लिकदेखील थांबविण्यात आले आहे.

बायप्सीनंतर मिळाली आतड्यांची माहिती - 
रुग्णालयातील डॉ. अनिल अरोडा यांनी सांगितले, की "आतड्यातून काढलेल्या तुकड्यांच्या बायप्सीनंतर लक्षात आले, की आतड्यांत व्हाइट फंगस आहे. यामुळे आतड्यांमध्ये फोडांसारखे घाव झाल्याने, अन्न नलिकेपासून छोट्या आणि मोठ्या आतड्यांत छिद्रे पडली होती.

स्टेरॉयइडच्या वापरानंतर ब्लॅक फंगसमुळे आतड्यांत छिद्र पडल्याची काही प्रकरणं नुकतीच समोर आली आहेत. मात्र, व्हाइट फंगसमुळे कोविड-19 इन्फेक्शननंतर, अन्न नलिका, छोट्या आणि मोठ्या आतड्यांत छिदे पडण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे, असेही डॉ. अरोडा म्हणाले.

Mucormycosis: देशातील पहिलीच केस! ब्लॅग फंगस थेट मेंदूत पोहोचला; डॉक्टरदेखील हैराण

याशिवाय, तपासातून रुग्णातील कोविड-19 अँटीबॉडी लेवल वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. रक्त तपासणीनंतर शरीरातील व्हाइट फंगस वाढलेला दिसला. आता सर्जरीनंतर रुग्णाची प्रकृती चांगली असून काही दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे.

Web Title: White fungus intestine case in sir ganga ram hospital Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.