ब्रिटनमधील कोणत्या वस्तू भारतात मिळतील स्वस्त? व्यापारात ५,८४,५०० कोटींच्या वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:33 IST2025-07-25T10:32:06+5:302025-07-25T10:33:41+5:30

भारत ब्रिटनकडून येणाऱ्या ९० टक्के वस्तूंवर टप्प्याटप्प्याने आयात शुल्क कमी करणार आहे.

Which British goods will be cheaper in India? Trade likely to increase by Rs 5,84,500 crore | ब्रिटनमधील कोणत्या वस्तू भारतात मिळतील स्वस्त? व्यापारात ५,८४,५०० कोटींच्या वाढीची शक्यता

ब्रिटनमधील कोणत्या वस्तू भारतात मिळतील स्वस्त? व्यापारात ५,८४,५०० कोटींच्या वाढीची शक्यता

भारत ब्रिटनकडून येणाऱ्या ९० टक्के वस्तूंवर टप्प्याटप्प्याने आयात शुल्क कमी करणार आहे. विशेषतः स्कॉच व्हिस्कीवरील कर १५० टक्क्यांवरून ७५ टक्के आणि पुढे ४० टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. यामुळे स्कॉच व्हिस्की स्वस्त होईल. सध्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त आयात शुल्क असलेल्या ब्रिटिश कार्स फक्त १० टक्के आयात शुल्कासह भारतात येतील. यामुळे स्वस्त होतील. वैद्यकीय उपकरणे, सौंदर्यप्रसाधने, औषधे, विमानाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क कमी झाल्याने या ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या या वस्तू स्वस्त होतील.

जागतिक बाजारपेठेत संधी
मुक्त व्यापार करारासंदर्भात किरीट भन्साळी म्हणाले की, हा करार आभूषण क्षेत्रासाठी ऐतिहासिक असून यामुळे भारतीय आभूषण निर्मात्यांना युकेसारख्या जागतिक बाजारपेठेत अधिक संधी मिळतील. यामुळे निर्यातच वाढणार नसून हजारो कारागीरांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक फायदा होई.

विशेष कॉफी टेबल बुकचे मान्यवरांकडून विमोचन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनी जीजेईपीसी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच किरीट भन्साळी यांच्याशी संवाद साधत कौतुकही केले. यावेळी दोघांनी भारत आणि ब्रिटनमधील सांस्कृतिक व व्यापारी संबंधांचे प्रतीक असलेल्या 'जेम ऑफ ए पार्टनरशिप' या विशेष कॉफी टेबल बुकचे विमोचन केले.

किरीट भन्साळी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले. या करारामुळे भारत आणि ब्रिटनमधील रत्न व आभूषणांचा व्यापार आगामी काही वर्षांत ७ अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याची शक्यता आहे.

Web Title: Which British goods will be cheaper in India? Trade likely to increase by Rs 5,84,500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.