शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

‘टिकैत हवे की डकैत, तुम्हीच ठरवा’; भावनिक आवाहनानंतर सीमांवर पुन्हा गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:16 IST

आज एक दिवसाचे उपोषण, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलवीर राजेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे इथला संघर्ष टळला. इथे आता शेतकऱ्यांची गर्दी होत असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६० हजारांपेक्षा अधिक शेतकरी या सीमेवर आहेत.

विकास झाडेनवी दिल्ली : सरकारने मृतावस्थेत आणलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये शुक्रवारी पहाटेपासूनच पुन्हा नवा जोश संचारला आहे. हजारो शेतकरी विविध सीमांवर गर्दी करीत आहेत. केंद्र सरकारला डाकूंची उपमा देत तुम्हाला ‘टिकैत हवेत की डकैत’ या शेतकरी नेत्यांच्या भावनिक आवाहनाला काही तासांतच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

२६ जानेवारीच्या संघर्षानंतर नंतरचे दोन दिवस शेतकरी नेते आणि लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण गेलेत. लक्षवेधी आंदोलन भूतकाळात जमा होईल असे चित्र निर्माण झाले होते. आंदोलकांची संख्या कमी होताना पाहून पोलीसही विविध सीमांवर दंडा उगारून होते. यात पलवल सीमेवरील आंदोलन संपविण्यात पोलीस दलाला यश आले. दुसरा नंबर होता गाझीपूर सीमेचा. इथले नेत्वृत्व राकेश टिकैत करीत आहे. गुरुवारी रात्री अर्धसैनिक बल आणि पोलिसांच्या अनेक तुकड्या गाझीपूर सीमेवर तैनात होत्या. योगी सरकारने या सीमेवरून आंदोलकांना हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपल्यावर रात्री आपत्ती येऊ शकते हे राकेश टिकैत यांनी हेरले. त्यांनी लगेच माध्यमांपुढे आपल्या भावना व्यक्त करीत अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. दोन महिन्यांपासून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेत, आता आम्ही सरकारच्या डोळ्यात आसंव पाहू असा निश्चय केला. समाजमाध्यमांवरून शेतकऱ्यांना ‘फिरते व्हा’ चे आवाहन करण्यात आले. त्याला इतका मोठा प्रतिसात मिळाला की १२ तासांतच ३० हजारांपेक्षा अधिक शेतकरी गाझीपूर सीमेवर आलेत. पलवलच्या सीमेवरून हाकलण्यात आलेले शेतकरीही गाझीपूर सीमेवर पोहचले. या सीमेवर पहिल्यांदाच ४० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. आता सरकारसोबत आरपारची लढाई करू असा संकल्पही करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची संख्या वाढतानाचे पाहून पिटाळण्यासाठी सज्ज असलेले सुरक्षा बल माघारी फिरले. टिकैत यांचे भावनिक आवाहन ऐकून हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेशमधून शेतकरी मोठ्या संख्येने पुन्हा गाझीपूर, सिंघू सीमेवर येत आहेत.

स्वातंत्र्यदिनी तुम्ही तिरंग्याचा अवमान केला असे कारण करीत शुक्रवारी दुपारपासूनच सिंघू सीमेलगतचे स्थानिक जरा आक्रमक झाले होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हजाराच्या जवळपास लोक होते. ते सगळेच भाजपचे असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. या टोळीने शेतकऱ्यांवर दगडफेक केली. त्यांनी सिंघू सीमा मोकळी करण्याचे सांगितले. शेतकरी हे अतिरेकी, देशद्रोही असल्याच्या घोषणा दिल्यात. प्रारंभी पोलीस मूकदर्शक होती. नंतर अश्रूधूर सोडला. यामागे स्थानिक आमदार असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला. एका स्थानिकाने तिथे तिरंगा झेंडा फडकवला. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलवीर राजेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे इथला संघर्ष टळला. इथे आता शेतकऱ्यांची गर्दी होत असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६० हजारांपेक्षा अधिक शेतकरी या सीमेवर आहेत.

राजकीय पाठिंबा!२६ जानेवारीच्या घटनेनंतर विरोधी राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. कॉँग्रेसने पाठिंबा दिला आहे. गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसचे नेते येऊन गेलेत. अखिलेश यादव यांनी टिकैत यांना फोन करुन पाठींबा दर्शवला. अरविंद केजरीवाल यांच्या वतीने उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी टिकैत यांची भेट घेतली. अजित सिंग चौधरी यांचा निरोप घेऊन त्यांचे पुत्र जयंत चौधरी हे सुद्धा गाझीपूर सीमेवर पोहचले आहेत.

आंदोलन सुरूच राहील - नरेश टिकैतमुजफ्फरनगर येथे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवर सुरू असलेले आंदोलन समाप्त करण्याची घोषणा गुरुवारी केली होती. परंतु रात्री या सीमेवर झालेल्या प्रकारामुळे त्यांनी घोषणा मागे घेतली. रात्री किसान भवन येथे आपतकालीन पंचायत बोलावण्यात आली आणि चौधरी नरेश टिकैत यांनी आता आंदोलन चालूच राहील असे सांगितले.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी