शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गरीब असो वा श्रीमंत, मोफत इलाज ₹5 लाखांपर्यंत; आयुष्मान कार्डांतर्गत या आजारांवर मिळणार FREE उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 23:52 IST

या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तब्बल 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करत 70 वर्षांवरील वृद्धांचाही या योजनेत समावेश केला आहे. या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तब्बल 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. 

गरीब असो वा श्रीमंत, या योजनेंतर्गत कुणीही 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आयुष्मान भारत योजनेत आधीपासूनच समावेश असला तरीही, कुटुंबातील 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्ध व्यक्तीलाही 5 लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र आरोग्य कवच मिळेल.

या आजारावर होणार मोफत उपचार? -आयुष्‍मान भारत योजनेंतर्गत अनेक अजारांवर मोफत उपचार मिळणार आहे. या आजारांत कॅन्सर, हार्ट डिसीज, किडनीशी संबंधित आजार, कोरोना, मोतीबिंदू, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, गुडघा आणि हिप प्रत्यारोपणास तब्बल 1760 प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. मात्र, सरकारने 196 आजारांना खासगी रुग्णालयात होणाऱ्या ट्रीटमेंटच्या लिस्‍टमधून हटवले होते. सरकारी रुग्णालयात या सर्व आजारांवर मोफत उपचार सुरू राहील.

असं तयार करा तुमचं कार्ड - आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी आपण पात्र आहात की नाही, हे सर्वप्रथम तपासावे लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in वर जा. होमपेजवर 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर सबमिट करावा लागेल. यानंतर नंबरवर मिळालेला ओटीपी टाका. आता स्क्रीनवर तुमचे राज्य निवडा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाका. यानंतर, तुम्ही पात्र आहात की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

जर वेबसाईटवर ही प्रोसेस करणे शक्य होत नसेल तर, टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करून आपली पात्रता तपास. जर आपण पात्र असाल, तर आपल्याला जवळच्या कॉमन सर्व्हीस सेंटरवर (CSC) जाऊन कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.

 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतNarendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकारhospitalहॉस्पिटल