जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 06:44 IST2025-08-09T06:44:16+5:302025-08-09T06:44:48+5:30

आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Wherever there are new voters, there is BJP's victory Rahul Gandhi's criticism | जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...

जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...

 

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीला सर्वांत मोठा विजय महाराष्ट्रात मिळाला होता; पण त्यानंतर चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्या राज्यात भाजपने विजय मिळविला. हा निकाल आश्चर्यकारक होता. त्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, एक कोटी नवीन मतदारांनी तिथे मतदान केले होते. या मतदारांची नावे लोकसभा निवडणुकांच्या वेळी मतदारयाद्यांमध्ये नव्हती. अशा लोकांनी विधानसभा निवडणुकांत मतदान केले. ही सर्व मते भाजपकडे गेली. हे काहीतरी चुकीचेे घडत असल्याचे लक्षण आहे. जिथे-जिथे नवीन मतदारांनी मतदान केले, तिथे-तिथे भाजप जिंकला आहे. आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आयोगाने सॉफ्ट कॉपी, व्हिडीओ दिले नाहीत
राहुल म्हणाले की, कर्नाटकामध्ये लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १५ ते १६ जागा मिळतील, असा आमच्या पक्षाने केलेल्या सर्वेक्षणांचा निष्कर्ष होता. आम्ही या निवडणुकांत १६ जागांवर पुढे होतो; पण प्रत्यक्षात फक्त नऊ जागा जिंकलो. आम्ही इतर जागांवर का हरलो, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची सॉफ्ट कॉपी मागितली; पण ती मागणी फेटाळली गेली.

महाराष्ट्रातील मोहोळ, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर यांसारख्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या वाढली. पण, तिथे काँग्रेस व मित्रपक्षांनीच विजय मिळवला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप फोल ठरले आहेत. 
भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री

भाजपकडून लोकशाही यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. या यंत्रणा नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे.  त्यामुळे लोकशाही टिकेल का असा प्रश्न आहे. पैशाच्या बळावर भाजप गैरप्रकार करतो, त्यातून स्वत:चा फायदा करून घेतो हे अतिशय धोकादायक आहे. 
अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री, राजस्थान

निवडणूक आयोग मशीन-रिडेबल फॉरमॅटमध्ये मतदार यादी का देत नाही? त्याऐवजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहेत. संसदेमध्ये घेतलेल्या शपथेपेक्षा आणखी कोणती शपथ मोठी असते? आम्ही ती शपथ घेतली आहे. आमचे म्हणणे जनतेसमोर मांडले  आहे. 
प्रियांका गांधी, खासदार, काँग्रेस 
 

Web Title: Wherever there are new voters, there is BJP's victory Rahul Gandhi's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.