कोरोना लसीसाठी पैसे कुठून आणणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 11:47 AM2020-11-24T11:47:08+5:302020-11-24T11:49:37+5:30

Corona vaccine News : कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

Where will get the money for the Corona vaccine? The answer to Rahul Gandhi's question was given by the Health Minister | कोरोना लसीसाठी पैसे कुठून आणणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

कोरोना लसीसाठी पैसे कुठून आणणार? राहुल गांधींच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा फैलाव आणि लसीकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर काल पुन्हा एकदा टीका केली होती. तसेच कोरोनाच्या लसीसाठी सरकार पैसे कुठून आणणार असा प्रश्न विचारला होता. दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रश्नाला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिलं आहे. कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी सर्व सरकारी योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोविडवरील लसीसाठीचा निधी आणि वितरणाबाबतची माहिती मागितली होती.

भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यास राज्यातील जनतेला मोफत कोरोनाची लस देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे वादास तोंड फुटले होते. त्यानंतर इतर अनेक राज्यांनीही मोफत लस देण्याची घोषणा केली होती. मात्र आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील लस ही सर्वांसाठी मोफत असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र काँग्रेस या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक राहिली आहे. याच लशीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लशी संदर्भात चार प्रश्न विचारले होते. कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न...
१. उपलब्ध होणाऱ्या करोना लशींमधून भारत सरकार कोणत्या लशीची निवड करणार? आणि का?
२. सर्वात प्रथम कोरोनाची लस कुणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? आणि त्याच्या वितरणाची सरकारची योजना काय?
३. लस मोफत उपलब्ध होईल यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिली होती. त्यानंतर कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लशी पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे चार सवाल उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला होता.

Web Title: Where will get the money for the Corona vaccine? The answer to Rahul Gandhi's question was given by the Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.