"राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते?" भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:24 AM2020-07-30T08:24:09+5:302020-07-30T11:05:40+5:30

एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

"Where does secularism go when there is an Iftar party at Rashtrapati Bhavan?" | "राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते?" भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल

"राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते?" भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जातेआम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाहीभाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींना लगावला टोला

नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त जाहीर झाल्यापासून या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारणास सुरुवात झाली आहे. एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही, असा टोला भाजपाचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसींना लगावला आहे.

ओवेसींनी केलेले ट्विट रिट्विट करत तेजस्वी सूर्या म्हणाले की, जेव्हा देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या अधिकृत निवासस्थानी इफ्तार पार्टींचे आयोजन करायचे तेव्हा तुमची धर्मनिरपेक्षता कुठे होती. मंदिर पाडून मशीद बांधली गेली होती. ती चूक आता दुरुस्त करण्यात आली आहे. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.



दरम्यान, असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटले होते. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावे, असा सवालही औवेसी यांनी उपस्थित केला आहे. आऊटलूक या वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत औवेसी यांनी बाबरी मशिद आणि अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनसंदर्भात आपले मत व्यक्त केले होते.

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ५ ऑगस्ट भूमिपूजन होत आहे. या भूमीपूजनाच्या समारंभाचे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोजकांनी दिलेले नाही. अर्थात अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलाविण्यात आलेले नाही. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपवाद आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

Web Title: "Where does secularism go when there is an Iftar party at Rashtrapati Bhavan?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.