पंजाबच्या बरनाला जिल्ह्यातील शाहना गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना एका ६६ वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. भूषण कुमार मित्तल असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहना गावातील रहिवासी भूषण कुमार मित्तल (वय, ६६) हे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी जवळच्या गॅस वितरण केंद्रावर गेले होते. गॅसचा तुटवडा किंवा वाढत्या मागणीमुळे तिथे ग्राहकांची मोठी रांग लागली होती. भूषण कुमार यांचा रांगेत २५ वा क्रमांक होता, ते दोन तास रांगेत उभे होते. परंतु, सकाळी १० च्या सुमारास अचानक भूषण कुमार यांच्या छातीत दुखू लागले आणि ते कोसळले. उपस्थित नागरिकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर आणि गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भदौर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते सुखविंदर सिंग धालीवाल यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. "मृत भूषण कुमार हे कष्टाळू व्यक्ती होते. केवळ एका गॅस सिलिंडरसाठी एका वृद्धाला दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागते, हे सरकारचे अपयश आहे. केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहायला हवे", असे सुखविंदर सिंग धालीवाल यांनी म्हटले.
Web Summary : In Punjab's Barnala, a 66-year-old man died of a heart attack while waiting in line for a gas cylinder. Bhushan Kumar Mittal collapsed after two hours. The incident raises concerns about gas distribution and government accountability.
Web Summary : पंजाब के बरनाला में गैस सिलेंडर के लिए लाइन में लगे 66 वर्षीय व्यक्ति की हृदयघात से मौत हो गई। भूषण कुमार मित्तल दो घंटे बाद गिर पड़े। घटना गैस वितरण और सरकारी जवाबदेही पर सवाल उठाती है।