जेथे पेटल्या ३,८०० कार, त्या जहाजात २१ भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:39 IST2023-08-05T08:39:01+5:302023-08-05T08:39:31+5:30

हे जहाज जर्मनीहून इजिप्तला जात असताना दुर्घटना घडली हाेती...

Where 3,800 cars were burnt, 21 Indians on board | जेथे पेटल्या ३,८०० कार, त्या जहाजात २१ भारतीय

जेथे पेटल्या ३,८०० कार, त्या जहाजात २१ भारतीय

 

लंडन : नेदरलँड्सच्या एका मालवाहू जहाजाला लागलेल्या भीषण आगीतून बचावलेले २० जखमी भारतीय क्रू मेंबर्स सुखरूप मायदेशी परतले आहेत. या घटनेत ठार झालेल्या खलाशाचा मृतदेह परत आणण्यात येत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मालवाहू जहाजात सुमारे ३,८०० कार भरल्या होत्या.

हे जहाज जर्मनीहून इजिप्तला जात असताना दुर्घटना घडली हाेती. या कठीण काळात मदत केल्याबद्दल डच अधिकाऱ्यांचे व आमच्या नाविकांच्या धैर्याबद्दल धन्यवाद, असे हेगमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

इलेक्ट्रिक कारनेआग...
जहाजाला आग का लागली याचे कारण समोर आले नसले तरी एका बचाव कर्मचाऱ्याच्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, ही आग इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीमधून पसरली. जहाजावर ३,७८२ कारपैकी ४९८ इलेक्ट्रिक वाहने होती.

Web Title: Where 3,800 cars were burnt, 21 Indians on board