शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

अर्थाचा अनर्थ ! पीएमओकडून ट्विट करताना घोडचूक, नेटक-यांनी घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 7:07 PM

अनेकांनी पंतप्रधान मोदींना यानंतर धारेवर धरलं तर मोदींचे समर्थकही त्यांची बाजू मांडण्यासाठी सरसावले...

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) करण्यात आलेल्या एका ट्विटचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला जात आहे. पीएमओने हे ट्विट करताना एक चूक केली आणि अर्थाचा घोर अनर्थ झाला. या ट्विटमध्ये एक स्वल्पविराम (कॉमा) देण्यास पीएमओ कार्यालय विसरलं आणि मोदी सरकारवर टीका करण्याची संधी शोधणा-यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. अनेकांनी पंतप्रधान मोदींना या ट्विटमुळे धारेवर धरलं तर मोदींचे समर्थकही त्यांची बाजू मांडण्यासाठी सरसावले, पण टीका करणा-यांची संख्या जास्त होती. या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींद्वारे राज्यसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला होता. चला आपण सर्व एकत्र मिळून गरीबांना चांगली गुणवत्ता असलेली आणि स्वस्त आरोग्यसेवा मिळेल यासाठी काम करू असं मोदी राज्यसभेत म्हणाले होते. पण ट्विट करताना गरीब आणि चांगली यामध्ये स्वल्पविराम देण्यास पीएमओ कार्यालय विसरलं. आपण सर्वांनी एकत्र मिळून खराब गुणवत्ता असलेली स्वस्त आरोग्यसेवा मिळेल यासाठी काम करू असा त्याचा अर्थ झाला. 

पंतप्रधान कार्यालयाकडून हे ट्विट येताच त्यावर टीका होण्यास सुरूवात झाली. या ट्विटला रिप्लाय देताना एका तरूणीने ट्विट केलं...''खराब आणि स्वस्त आरोग्यसेवा...मला आश्चर्य वाटलं नाही...यापेक्षा दुसरं काहीही होऊ शकत नाही''. ''भाजपाला शाळेत जाण्याची गरज आहे'' असं ट्विट एका युझरने केलं. ''अखेर सत्य बोलण्याची तुम्ही हिंमत केलीच....हे मान्य केल्याबद्दल तुमचे आभार'' असं ट्विट आणखी एका युझरने केलं . तर ''एक कॉमा चुकल्यामुळे कोमात जाण्याची वेळ आली'' असं ट्विटही एकाने केलं. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानTwitterट्विटरTrollट्रोल