शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मी तुमच्याएवढा होतो, तेव्हा कोणी अपेक्षाच ठेवत नव्हता...; नारायण मूर्तींचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 22:38 IST

तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा....

देशाला सर्वात महत्वाची अशी आयटी कंपनी देणाऱ्या इन्फोसिसच्या सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी आज देशाबरोबरच आपल्या आयुष्याचा प्रवास कसा झाला हे सांगितले. अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ते विद्यार्थी आणि तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी २००८ चा एक किस्सा सांगितला. 

तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. एखादी बैठक सुरु झाली किंवा विषय निघाला की तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा. मी जेव्हा बोर्डावरून बाहेर पडलो तेव्हा क्वचितच भारताचे नाव घेतले जात होते. तर चीनचे नाव २५ ते तीस वेळा घेतले जात होते. या चीनने केवळ ४४ वर्षांत भारताला मागे टाकले. त्या काळात भारतासोबत काय झाले हे आपल्याला माहिती नाही. मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्तीमत्व होते, माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. परंतू युपीएच्या काळात देशाचा विकास खुंटला गेला, असे ते म्हणाले. 

तो असा काळ होता, की या काळात वेगाने निर्णय घेतले जात नव्हते. प्रत्येक कामात विलंब होऊ लागला होता. याच काळात भारत चीनपेक्षा मागे पडू लागला. यामुळे मला वाटतेय की तुमची पीढी खूप महत्वाचे काम करू शकेल. जिथे जिथे चीनचे नाव येईल तिथे भारताचेही नाव आले पाहिजे, असे काम तुम्ही करायला हवे. जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो, तेव्हा माझ्यावर कोणताही जबाबदारी नव्हती. नाही कोणी माझ्याकडून काही अपेक्षा करत होता. भारताचीही तिच परिस्थिती होती. देशाकडूनही जग फारशी अपेक्षा करत नव्हते. पण आज तुम्ही देशाला पुढे न्याल अशी अपेक्षा आहे. मला वाटते की तुम्ही लोक भारताला चीनचा योग्य प्रतिस्पर्धी बनवू शकाल, असे मूर्ती म्हणाले. 

जेव्हा मनमोहन सिंग अर्थ मंत्री होते, आणि १९९१ मध्ये देशाच्या आर्थिक क्रांतीला सुरुवात झाली. आता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडियासारख्या योजना सुरु केल्यात, त्यामुळे भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असे मूर्ती म्हणाले. एक काळ होता जेव्हा पाश्चात्य देशांचे लोक भारताकडे नुसते पाहत असत, पण आज त्यांच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असे मूर्ती म्हणाले.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarayana Murthyनारायण मूर्तीNarendra Modiनरेंद्र मोदी