Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 09:34 IST2020-03-03T09:27:48+5:302020-03-03T09:34:16+5:30
समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे.

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेल्या व जगभरात कोट्यवधी ‘फॉलोअर्स’ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी (3 मार्च) अचानक जाहीर केला. समाजमाध्यमांच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेले नाही. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींसाठी आपला प्रोफाईल फोटो बदलला होता.
झुकेरबर्ग यांनी मोदी सरकारच्या फ्लॅगशिप प्रोग्राम डिजिटल इंडियाच्या समर्थनार्थ आपला प्रोफाईल फोटो बदलला होता. सप्टेंबर 2015 मध्ये झुकेरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींना फेसबुकच्या हेडक्वार्टर्समध्ये आमंत्रित केले होते. मोदींची भेट घेण्याआधी त्यांनी फेसबुकवर आपला प्रोफाईल फोटो बदलला होता. तसेच 'मी डिजिटल इंडियाच्या समर्थनासाठी आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे. ग्रामीण भाग हा इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत अधिक सेवा ऑनलाईन पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे' असं त्यांनी फेसबुकवर म्हटलं होतं.
'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला? #NarendraModihttps://t.co/r9z1Rw67Rx
— Lokmat (@MiLOKMAT) March 3, 2020
बदललेल्या प्रोफाईल फोटोवर तिरंगा होता. तसेच नरेंद्र मोदींनीही त्यावेळी सोशल मीडियावर असलेलं प्रेम जाहीर केलं होतं. पंतप्रधान मोदींनी रात्री 8.52 वाजता एक ट्विट केलं. मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन. अनेक मोदी चाहत्यांनी त्यांना हा निर्णय बदलवावा अशी मागणी करत आहेत. पण नेमकं नरेंद्र मोदीसोशल मीडियावरील अकाऊंट का बंद करतायेत? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तडकाफडकी आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. आज त्यांनी आणखी एका मोठ्या वादळाची कल्पना दिली आहे.https://t.co/mKBG0GVUtD#NarendraModiGiveUp
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फॅन फॉलोअर्स सोशल मीडियावर आहे. कोट्यवधी युजर्स नरेंद्र मोदींना फॉलो करतात. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून नरेंद्र मोदी जनतेशी संवादही साधतात, मग त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकले नाही. पण नरेंद्र मोदींनी याप्रकारचं ट्विट केल्यानंतर अनेक शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरू करण्यात आला आहे. जवळपास 50 हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला. पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण स्वत: नरेंद्र मोदीच याचं उत्तर देतील. मात्र काही शक्यता सोशल मीडियावर वर्तवली जात आहे.
Narendra Modi यांच्या 'संन्यासा'च्या घोषणेनंतर राज ठाकरेंची 'ती' पोस्ट चर्चेत! https://t.co/E9ftiBIWac
— Lokmat (@MiLOKMAT) March 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार
भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण
द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी
‘निर्भया’च्या चारही खुन्यांची आजची फाशीही टळली