पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 10:16 IST2025-09-21T10:12:23+5:302025-09-21T10:16:37+5:30

Amit Shah Narendra Modi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट कशी झाली, याबद्दलची आठवण सांगितली. 

When did you first meet Prime Minister Narendra Modi? Amit Shah tells the whole story | पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा

Amit Shah Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील मैत्रीबद्दल नेहमीच चर्चा होते. हे दोन्ही नेते आधी गुजरातमध्ये सोबत काम करत होते. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रातही सोबत आहेत. त्यामुळे दोघांतील मैत्रीच्या नात्याची सुरूवात कशी झाली, याबद्दल सगळ्यानाच कुतूहल आहे. याचबद्दल जेव्हा नरेंद्र मोदींशी पहिल्यांदा भेट कधी आणि कशी झाली, असा प्रश्न अमित शाह यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी जुना किस्सा सांगत आठवणींना उजाळा दिला. 

एका मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, "मी पहिल्यांदा ८०च्या दशकात भेटलो होतो. दशकाच्या सुरूवातीला. त्यावेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते. संघाचे एक वरिष्ठ पदाधिकारी होते. त्यांचा एक अहमदाबादमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम होता. त्याची तयारी करण्यासाठी ते मी जिथे राहायचो, तिथे आले होते."

"कमी तरुण होते. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आरएसएसचे काम, आरएसएसबद्दल, देशाला कसं बदललं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि अखेरीस म्हणाले की, आरएसएसबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर यांना ऐकलं पाहिजे", असा किस्सा अमित शाहांनी मोदींच्या पहिल्या भेटीबद्दलचा सांगितला.

"तेव्हा मी आरएसएसचा स्वयंसेवक बनलेलो होतो. पण, पहिल्यांदा संघाचा स्वयंसेवक काय करू शकतो हे त्यांनी खूप मुद्देसूदपणे सांगितले. मला आठवत की माझ्यासह इतर तरुण हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून काम करत होते आणि तो कार्यक्रम खूप चांगला झाला होता", अशी आठवण अमित शाह यांनी सांगितली. 

भाजपचे काम पहिल्यांदा कोणी सुरू केलं? 

अमित शाह म्हणाले की, "मी आधी भाजपसोबत काम सुरू केलं. आम्ही दोघंही भाजपसाठी काम करतो. जसे कोट्यवधी कार्यकर्ते भाजपसाठी काम करतात, मोदीजींसोबत. देशातच नाही, तर जगभरातून जोडले गेले आहेत."

"पक्षाचा अध्यक्ष निवडण्यामध्ये पंतप्रधानांची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण, फक्त पंतप्रधानांचाच असत नाही, तर पक्षाचाही असतो. माझ्या व्यतिरिक्त कोणताही कार्यकर्ता बनू शकला असता. नंतर नड्डाजी बनले", असेही अमित शाह यांनी सांगितले.

Web Title: When did you first meet Prime Minister Narendra Modi? Amit Shah tells the whole story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.