Indian Railways : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' महत्वाच्या गोष्टीवर ठेवा लक्ष!; रेल्वेनं केलं अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 13:45 IST2020-12-07T13:39:58+5:302020-12-07T13:45:06+5:30
रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.

Indian Railways : रेल्वेचं तिकीट बुक करताना 'या' महत्वाच्या गोष्टीवर ठेवा लक्ष!; रेल्वेनं केलं अलर्ट
नवी दिल्ली -रेल्वे प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करताना आवश्यक माहितीसह मोबाईल नंबर टाकायला विसरू नका. भारतीय रेल्वेने (Indian Railways) यासंदर्भात प्रवाशांना सूचना दिल्या आहेत. रेल्वे तिकीट घेताना संपूर्ण माहिसीसह आपला मोबाईल नंबरही टाका. जेणे करून रेल्वेकडून देण्यात येणारे अपडेट मिळण्यास आपल्याला त्रास होणार नाही, असे रेल्वेने म्हटले आहे.
भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला जात आहे. यामुळे ज्या कोलांनी तिकीट बुक करताना आपला नंबर दिलेला नाही, त्यांना रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती मिळू शकत नाही. अशात प्रवाशांना ट्रेन सुटण्यासारख्या त्रासालाही सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या वेळेसंदर्भात माहिती देण्यासाठी रेल्वेने संबंधित प्रवाशाच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर रेल्वेच्या वेळेत झालेल्या बदलांचा SMS पाठवणेही सुरू केले आहे.
रेल्वेकडून सांगण्यात आले आहे, की काही प्रवासी एजन्ट्सच्या माध्यमाने तिकीट बुक करतात. यामुळे अनेक वेळा पीआरएस सिस्टिममध्ये प्रवाशांचा मोबाईल नंबर उपब्ध नसल्याने असुविधा निर्माण होते. यामुळे रेल्वेने एखाद्या रेल्वेची वेळ बदलली अथवा एखादी रेल्वे रद्द केली तर त्याची माहिती प्रवाशांना एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकत नाही. यामुळे त्यांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो.
रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे, की प्रवासासाठी तिकीट बुक करताना रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये मोबाईल नंबर लिहावा. जेनेकरून रेल्वेसंदर्भातील महत्वाची माहिती एसएमएसच्या माध्यमाने मिळू शकेल.