शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

व्हॉटसअ‍ॅप हेरगिरी प्रकरण: ही तर मागच्या दारानं येणारी हुकूमशाही; राष्ट्रवादी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 16:05 IST

पत्रकार, दलित संघटनेचे नेते, बुद्धिजीवींवर पाळत ठेवण्याचं कारण काय?; राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई: गुन्हेगारांवर पाळत ठेवली असती तर समजू शकलो असतो. पण पत्रकार, दलित संघटनेचे नेते आणि बुद्धिजीवींवर पाळत ठेवण्याचं कारण काय, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हेरगिरी करणाऱ्या एजन्सीनं आपण याबद्दलचं तंत्रज्ञान केवळ सरकारला विकत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून झालेली हेरगिरीमागे सरकारचा हात असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. देशातलं सरकार सर्वसामान्यांना मोकळेपणानं जगून देत नाही. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून होणारी ही हेरगिरी अमेरिकेत उघडकीस आली. त्यामुळे याबद्दलची माहिती आपल्याला समजली. अन्यथा याविषयीची कोणतीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलीत नसती, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अमेरिकेत गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणाचा संदर्भ दिला. वॉटरवेट प्रकरणात अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा सहभाग उघड झाल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप हेरगिरी प्रकरणात सरकारचा सहभाग असल्याचं समोर आल्यास त्यांनीही सत्तेतून पायउतार व्हावं, असंदेखील ते पुढे म्हणाले.व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याच देशाच्या नागरिकांवर ठेवली जाणारी पाळत ही मागच्या दारानं येणारी हुकूमशाही असल्याचा दावा त्यांनी केला. हेरगिरीसाठी आवश्यक असणारं स्पायवेअर आम्ही फक्त सरकारला देतो, असा संबंधित कंपनीचा दावा आहे. त्यामुळे हेरगिरी कोणी केली हे उघड आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. गुजरातची संस्कृती देशभरात नेण्याचा प्रयत्न सध्या काहींकडून सुरू आहे. संजय जोशी कोण होते, त्यांचं पुढे काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. त्यावेळी जे जोशींसोबत झालं, तेच आता व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू आहे, असं आव्हाड म्हणाले.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलJitendra Awhadजितेंद्र आव्हाड