व्हॉट्सॲप पेक्षा भारी टेलिग्राम! ठरले सर्वाधिक डाउनलोड होणारे ॲप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 03:00 AM2021-02-09T03:00:44+5:302021-02-09T03:02:47+5:30

व्हॉट्सॲपने ग्राहकांसाठी नव्या धोरणाचा स्वीकार करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, त्याआधीच अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने ही अंतिम मुदत मेपर्यंत वाढविण्यात आली. परंतु तरीही अनेकांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला.

WhatsApp in the eye of storm as almost 80 percent Indians consider moving to Telegram | व्हॉट्सॲप पेक्षा भारी टेलिग्राम! ठरले सर्वाधिक डाउनलोड होणारे ॲप

व्हॉट्सॲप पेक्षा भारी टेलिग्राम! ठरले सर्वाधिक डाउनलोड होणारे ॲप

Next

नवी दिल्ली : व्यक्तिगततेवर गदा आणणाऱ्या व्हॉट्सॲपच्या धोरणाचा बाऊ करत गेल्या महिन्यात अनेक वापरकर्त्यांनी टेलिग्राम, सिग्नल यांसारख्या मेसेजिंग ॲपचा अवलंब केला. व्हॉट्सॲपने ग्राहकांसाठी नव्या धोरणाचा स्वीकार करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी निश्चित केली होती. मात्र, त्याआधीच अनेकांनी व्हॉट्सॲपला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा लावल्याने ही अंतिम मुदत मेपर्यंत वाढविण्यात आली. परंतु तरीही अनेकांनी व्हॉट्सॲपचा त्याग केला. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या महिन्यात टेलिग्राम ॲप डाउनलोड करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.

६.३० काेटी जणांनी टेलिग्राम ॲप डाउनलोड केले एकट्या जानेवारी महिन्यात 
४ पटींनी वाढ गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत

टेलिग्रामनंतर टिकटॉक या ॲपचा क्रमांक लागतो
गेल्या महिन्यात जगभरात टेलिग्रामनंतर सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप म्हणजे टिकटॉक होय
चीनमध्ये १७ टक्के लोकांनी तर अमेरिकेत १० टक्के लोकांनी टिकटॉक डाउनलोड केले
ॲपल ॲप स्टोअर तसेच गुगल प्ले स्टोअर या दोन्हींच्या डाउनलोडच्या प्रमाणातही १ ते ३१ जानेवारी या कालावधीत वाढ झाली

१.१५ काेटी भारतीयांनी गेल्या महिन्यात टेलिग्रामला आपलेसे केले
६.०३काेटी इंडोनेशियन लोकांकडून टेलिग्राम डाउनलोड

४०काेटी भारतीय वापरकर्ते व्हॉट्सॲपचे आहेत
त्यामुळे भारतात व्हॉट्सॲपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: WhatsApp in the eye of storm as almost 80 percent Indians consider moving to Telegram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.