ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 04:43 IST2025-05-15T04:41:45+5:302025-05-15T04:43:48+5:30

पाकिस्तान आपली अण्वस्त्रे नेमकी कुठे ठेवतो? अण्वस्त्रांच्या बंकरवरील हल्ल्याने ‘अणुस्फोट’ होईल का? किरणोत्सर्गी घटकांची गळती झाली तर काय होईल?

what would have happened if brahmos missile has hit a nuclear weapons depot in pakistan in operation sindoor | ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्राने नूर खान (चकलाला) हवाई तळ आणि इतर प्रमुख लष्करी कार्यालये आणि हवाई तळांना टार्गेट केले. त्यामुळे जर सुपरसॉनिक क्षेपणास्त्र अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? 

अण्वस्त्रांच्या बंकरवरील हल्ल्याने ‘अणुस्फोट’ होईल का?

अण्वस्त्रांच्या बंकरवर सुपरसॉनिक क्षेपणास्त्राने हल्ला केल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, पण अणुस्फोट घेऊ शकत नाही. यामुळे धोका अणुबॉम्बच्या स्फोटाचा नाही तर किरणोत्सर्गी गळती आणि पर्यावरणीय प्रदूषणाचा आहे.

अण्वस्त्रे सक्रिय करण्यासाठी अत्यंत अचूक इलेक्ट्रॉनिक कोड, विशेष कमांड सीक्वेन्स आणि अनेक स्तरांच्या सुरक्षा इंटरलॉकिंग सिस्टमची आवश्यकता असते. कोणत्याही पारंपरिक स्फोटाने किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याने अणुस्फोट होत नाहीत.

अण्वस्त्रे कशी साठवली जातात? 

अण्वस्त्रे अत्यंत सुरक्षित आणि मजबूत भूमिगत बंकर किंवा विशेष शस्त्र साठवणुकीच्या ठिकाणी साठवली जातात. या सुविधा सुरक्षेच्या अनेक स्तरांसह अत्यंत खोलवर बांधल्या जातात: 

भौतिक सुरक्षा : उच्च व्होल्टेज काटेरी तार, रेझर वायर आणि सुरक्षा भिंत. 

अखंडित वीजपुरवठा आणि प्रवेश नियंत्रण : साइटवर अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला जातो. प्रवेश इलेक्ट्रॉनिक प्रवेश प्रणालीद्वारे नियंत्रित केला जातो.

साठवणूक : प्रत्येक अण्वस्त्र स्टीलने बांधलेल्या ठिकाणी ठेवले जाते. 

देखरेख : मोशन सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रगत देखरेख प्रणालींद्वारे सुविधेचे सतत निरीक्षण केले जाते. 

पाकिस्तान आपली अण्वस्त्रे नेमकी कुठे ठेवतो?

मसरूर एअरबेस (कराची) : मिराज स्क्वॉड्रनच्या तळावर भूमिगत साठवणूक केली असल्याची शक्यता आहे.

सरगोधा गॅरिसन : प्रमुख साठवणूक स्थळ, जिथे अण्वस्त्रे सक्षम एफ-१६ विमाने तैनात केलेली आहेत.

भोलारी एअरबेस (सिंध): अण्वस्त्रांच्या साठ्याचे सूचक असलेले उच्च सुरक्षा उपाय येथे करण्यात आले आहेत.

बलुचिस्तान भूमिगत सुविधा : अज्ञात भूमिगत परिसर संभाव्य अण्वस्त्र ठेवली असल्याचे ठिकाण.

जर किरणोत्सर्गी घटकांची गळती झाली तर काय होईल? 

जर एखादा बंकर बस्टर किंवा क्षेपणास्त्र बंकरमध्ये खोलवर आले तर स्थिती डर्टी बॉम्बसारखी स्थिती निर्माण होते. संरचनात्मक नुकसान आणि गळतीचा धोका वाढतो. पण तरीही अणुस्फोटाची शक्यता शून्य राहते. त्या भागात किरणोत्सर्ग पसरू शकतो.

 

Web Title: what would have happened if brahmos missile has hit a nuclear weapons depot in pakistan in operation sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.