सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 21:02 IST2025-10-06T21:02:24+5:302025-10-06T21:02:53+5:30
CJI Bhushan Gavai News: देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर आज सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील राकेश किशोर नावाच्या वकिलाने हे धक्कादायक कृत्य केले होते. या घटनेनंतर सदर वकिलावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती. दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनी बूट फेकणाऱ्या वकिलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय
देशाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर आज सर्वोच्च न्यायालयात चप्पल फेकण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील राकेश किशोर नावाच्या वकिलाने हे धक्कादायक कृत्य केले होते. या घटनेनंतर सदर वकिलावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती. दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनी बूट फेकणाऱ्या वकिलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तसेच या वकिलाला मोठ्या मनाने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलावर आता कुठलीही कारवाई होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक वकिल सरन्यायाधीशांच्या आसनाच्या दिशेने गेला. त्यानंतर त्याने त्याच्या पायातील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. तर सदर व्यक्तीने सरन्यायाधीशांच्या दिशेने कागदांचा रोल फेकण्याचा प्रयत्न केला असे काहींनी सांगितले. दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांनी घडलेल्या घटनेला फारसं गांभीर्याने न घेता सदर कृत्याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे.
मात्र या घटनेमुळे अवाक् झालेल्या सरन्यायाधीश गवई यांनी गोंधळाकडे दुर्लक्ष करून वकिलांना युक्तिवाद चालू ठेवण्यास सांगितले. या प्रकारामुळे आम्ही विचलित झालेलो नाही. तुम्हीही विचलित होऊ नका. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. .