शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

Toolkit : टूलकिट म्हणजे नेमकं काय? त्याचा शेतकरी आंदोलन, ग्रेटा अन् दिशाशी काय संबंध? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:09 IST

farmers protest greta thunberg disha ravi and toolkit controversy: दिल्लीत २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारामागे टूलकिट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. पोलिसांनी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर जगभरातून आंदोलनाची दखल घेतली गेली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं (Greta Thunberg) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं.

what is toolkit how it is related to farmers protest Greta Thunberg and Disha Ravi"एका निशस्त्र तरुणीला बंदूकवाले घाबरले", दिशाच्या अटकेवर प्रियंका गांधी कडाडल्याग्रेटा थनबर्गनं शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये एक टूलकिट (Toolkit) होतं. यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काय काय करता येईल, यामध्ये कसा सहभाग घेता येईल याबद्दलची माहिती होती. ग्रेटानं ३ फेब्रुवारीला केलेल्या ट्विटमध्ये एक टूलकिट होतं. पण तिनं ते ट्विट डिलीट केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिनं नवीन ट्विट केलं. यामध्ये 'अपडेटेड टूलकिट' असल्याचा उल्लेख होता. दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे ग्रेटानं शेअर केलेलं टूलकिट असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. त्यामुळे दिल्लीतला हिंसाचार पूर्वनियोजित होता का, या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे."जर 22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरत असेल तर भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय"टूलकिट म्हणजे नेमकं काय?एखादा मुद्दा समजावून सांगण्यासाठी टूलकिटचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या मुद्दयाबद्दल जनजागृती निर्माण करता येते. प्रचार-प्रसारास मदत होते. ठराविक समूहासाठी, वर्गासाठी टूलकिट तयार केलं जातं. त्यामध्ये विशिष्ट विषयाची सविस्तर माहिती असते. एखादी याचिका, आंदोलन याबद्दलची माहिती अनेकदा टूलकिटच्या माध्यमातून दिली जाते. टूलकिट हे एक गुगल डॉक्युमेंट आहे. आंदोलनाचं स्वरुप, वेळ, काळ याची माहिती टूलकिटमधून दिली जाते. एखाद्या आंदोलनाची दिशा टूलकिटमधून सांगितली जाते. त्यामुळे आंदोलनात टूलकिटला अतिशय महत्त्व आहे."कार्यकर्त्यांना जेल आणि दहशतवाद्यांना बेल", दिशाच्या अटकेवरून शशी थरूर यांचा मोदी सरकारवर घणाघात शेतकरी आंदोलनाशी टूलकिटचा संबंध काय?शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ग्रेटा थनबर्गनं एक ट्विट केलं. तिनं ३ फेब्रुवारीला केलेल्या ट्विटमध्ये गुगल टूलकिट होतं. पण तिनं हे टूलकिट नंतर डिलीट केलं. या टूलकिटचा दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ फेब्रुवारीला दिशा रवीला (Disha Ravi) अटक केली. दिशा पर्यावरण कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहे.देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी काय संबंध? जाणून घ्यादिशा रवीचा टूलकिटशी काय संबंध?पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गसोबत दिशा रवीनं शेअर टूलकिट डॉक्युमेंट शेअर केलं होतं, असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. २६ जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान हिंसाचार झाला. त्या कटात दिशाचा सहभाग होता. ती या कटाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचा आरोपदेखील पोलिसांनी केला आहे. 'दिशानं यासाठी एक व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला होता. या माध्यमातून तिनं टूलकिट तयार केलं,' अशी माहिती पोलिसांनी ट्विट करून दिली. या ग्रुपमधील सगळे जण खलिस्तानचं समर्थन करणाऱ्या पोएटिक जस्टिस संस्थेच्या संपर्कात होते, असा दावादेखील पोलिसांनी केला आहे.दिशा रवी आहे तरी कोण? तिचा ग्रेटा थनबर्गशी संबंध काय?दिशा रवी २२ वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं २०१८ मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं २०१९ मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते.

दिशा रवी नेमकं काय काम करते?हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.दिशावर कोणकोणते गुन्हे दाखल?दिशाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वेष भावना निर्माण करण्यासाठी कारस्थान रचल्याचा गुन्हादेखील तिच्याविरोधात नोंदवला गेला आहे. दिशाला १४ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली.

टॅग्स :Toolkit Controversyटूलकिट वादDisha Raviदिशा रविGreta Thunbergग्रेटा थनबर्गFarmers Protestशेतकरी आंदोलन