शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

१२ वी उत्तीर्ण असलेले भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे एकूण संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:57 IST

२००६ साली पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर २०१०, २०१५,२०२०, २०२५ या निवडणुकीत ते सातत्याने विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेत.

नवी दिल्ली - बिहारच्या राजकारणात पुढे येत राष्ट्रीय राजकारणात भाजपाच्या अध्यक्षपदी नितीन नबीन यांची अधिकृतपणे निवड झाली आहे. मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या मुख्यालयात झाली. बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले नितीन नबीन बांकीपूर मतदारसंघातून सलग ५ वेळा आमदार बनले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली. ज्यानुसार १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेले नितीन नबीन यांची संपत्ती ३ कोटीहून अधिक आहे.

३ कोटी संपत्ती, ५६ लाखांचं कर्ज

बिहारच्या राजकारणात नितीन नबीन यांचं मोठं नाव आहे. २००६ साली पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर २०१०, २०१५,२०२०, २०२५ या निवडणुकीत ते सातत्याने विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती ३.०६ कोटी इतकी आहे तर त्यांच्यावर ५६ लाखांचे कर्जही आहे. नितीन नबीन आणि त्यांच्या कुटुंबाकडे ६० हजार रोकड होती आणि पती-पत्नी दोघांच्या नावे विविध बँकांमध्ये ९८ लाख रूपये आहेत असं त्यांनी उमेदवारी अर्जावेळी दिलेल्या कागदपत्रातून माहिती दिली.

पत्नीची शेअर बाजारात गुंतवणूक 

भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी शेअर बाजारापासून अंतर ठेवले आहे परंतु त्यांची पत्नी शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहे. त्यांनी मिडकॅप, मल्टीकॅप फंडमध्ये ६ लाखाहून अधिक गुंतवणूक केली आहे. नितीन नबीन यांच्याकडे ३ एलआयसी पॉलिसी आणि एक एचडीएफसी पॉलिसी आहे. पत्नीकडे एलआयसी, एसबीआय लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. त्याशिवाय Navira Enterprises मध्ये नितीन नबीन यांच्या पत्नी संचालिका आहेत. नितीन नबीन यांच्याकडे एक स्कोर्पिओ आणि एक इनोव्हा क्रिस्टा कार आहे. पती-पत्नी आणि मुलांकडे ११ लाख किंमतीचे सोने चांदी ज्वेलरी आहेत. त्यानुसार नितीन नबीन यांच्याकडे स्थावर मालमत्ता ९२.७१ लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नी आणि मुलांकडे ६८ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम मालमत्ता होती.

दरम्यान, भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे कुठलीही शेतजमीन नाही, व्यावसायिक इमारती किंवा घरे नाहीत. त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये २८ लाख रुपयांची शेतजमीन आणि पाटण्यातील १.१८ कोटी रुपयांचे घर समाविष्ट आहे. 

टॅग्स :Nitin Nabinनितीन नबीनBJPभाजपा