शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय?, सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 17:45 IST

Maharashtra Political Crisis : सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी ५ वाजता सुनावणी सुरु झाली असून शिवसेनेची बाजू वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रथम युक्तिवादास सुरुवात केली. मला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत असं शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.  उद्या बंडखोर आमदारांना मतदान करण्यास देणं हे लोकशाहीविरोधात असल्याचं सिंघवी सर्वोच्च न्यायालयात म्हणाले.  

सर्वोच्च न्यायालयात  राज्यपालांचे पत्र त्यांच्या कार्यालयातून व्हायरल झालं यावर सिंघवी यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यपालांनी जलद गतीने घाईघाईने निर्णय घेतला. आम्हाला अधिक कालावधीची गरज आहे. राष्ट्रवादीचे २ आमदार कोरोनाबाधित असून आम्हाला पुरेसा अवधी मिळालेला नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबाबत अद्याप निर्णय नाही. असं असून देखील बहुमत चाचणी कशी काय? ,११ जुलैनंतर अपात्रतेबाबत निर्णय येणार असून त्यानंतर बहुमताचा आकडा कमी जास्त होऊ शकतो, असे सिंघवी युक्तिवाद करताना म्हणाले.

शिंदे गटाची बाजूने नीरज कौल तर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बाजू वकील राजीव धवन मांडत आहेत. बहुमताची चाचणी आणि अपात्रतेची निर्णय याचा संबंध काय असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच न्या. सूर्य कांत यांनी बहुमत चाचणी कधी करू शकतात याबाबत काही नियम आहे का? अशी विचारणा सिंघवी यांना केली. दोन बहुमत चाचण्यांमध्ये सहा महिन्याच्या कालावधी गरजेचं आहे, असे सिंघवी म्हणाले. वैध बहुमत चाचणी होण्यासाठी अधिक कालावधीची गरज आहे. कारण १२ जुलैला आमदार अपात्र ठरले, तर अपात्र आमदारांचे मत अवैध ठरेल असे सिंघवी युक्तिवाद करताना म्हणाले. सिंघवी यांनी युक्तीवाद करताना राजेंद्र सिंह राणा यांच्या केसचा दाखला दिला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणVotingमतदानMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ