शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:06 IST

Tejashwi Yadav Lalu Prasad Yadav Bihar Election Failure: तेजस्वी यादवांवर आज जी वेळ आली तशीच वेळ त्यांच्या वडिलांवरही आली होती

Tejashwi Yadav Lalu Prasad Yadav Bihar Election Failure: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चित झाले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंतचे ट्रेंड आणि निकाल एनडीएला मोठा विजय मिळवून देणारे दिसले. राज्यातील २४३ विधानसभा जागांपैकी NDA १९०-१९९ जागांवर आघाडीवर आहे, तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीला (ग्रँड अलायन्स) मोठा फटका बसला. महाआघाडीने ५० जागांचा टप्पाही ओलांडला नाही. काँग्रेस-आरजेडी महागठबंधनकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव यांना मोठा दणका बसला. २०२५ मध्ये एनडीएचा झालेला हा विजय २०१०च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करून देतो. ही निवडणूक अशी होती, ज्यामध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने उल्लेखनीय कामगिरी करत लालू प्रसाद यादवांना मात दिली होती. (Bihar Assembly Election 2025)

२०१० मध्ये काय घडलं होतं?

२०१०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष एनडीएचा भाग होता. जागावाटपात जेडीयूने १४१ जागा लढवल्या होत्या, तर भाजपने १०२ जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत सुशील कुमार मोदी बिहार भाजपचा एक प्रमुख चेहरा होते. लालू प्रसाद यादव यांच्या राजदने १६८ जागा लढवल्या आणि रामविलास पासवान यांच्या लोजपाने ७५ जागा लढवल्या होत्या. राज्यातील सर्व २४३ जागांवर काँग्रेसने स्वतःहून उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत महाआघाडी नव्हती. फक्त राजद आणि लोजपा यांच्यातच आघाडी होती. त्यावेळी रामविलास पासवान हे लोजपाचे प्रमुख होते आणि त्यांनी लालू यादव यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला.

एनडीएने जिंकल्या होत्या २०६ जागा

निवडणूक निकालांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, एनडीएने विक्रमी २०६ जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी आरजेडी, एलजेपी आणि काँग्रेसला फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले होते. जेडीयूने ११५ जागा जिंकल्या, तर भाजपने ९१ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, आरजेडीने २२ जागा, एलजेपीने तीन आणि काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. इतर जागांमध्ये, सीपीआयने एक, आयएनडीने सहा आणि झामुमोने एक जागा जिंकली. अशाप्रकारे, २०१० च्या निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला होता, तर विरोधी पक्ष ५०च्या पुढेही जाऊ शकला नव्हता. आज तशाच प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

लालू प्रसाद यादव राजकारणापासून दूर

२०१० हा काळ असा होता जेव्हा लालू यादव बिहारच्या राजकारणात सक्रिय होते. त्यावेळी तेजस्वी यादव राजकारणात नवीन होते. सध्या वय, असंख्य आरोप आणि शिक्षेमुळे लालू यादव राजकारणापासून दूर आहेत. त्यांचा राजकीय सहभाग आता त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित आहेत. तेजस्वी यादव यांनी यंदा पक्षाच्या तिकीट वाटपापासून ते राजकीय रणनीतीपर्यंत सर्व गोष्टींसाठी जबाबदार होते. काही सार्वजनिक सभा वगळता, लालू यादव प्रचारापासून मोठ्या प्रमाणात दूर होते. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी तेजस्वी यादव यांनी घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar election repeats 2010 history: Defeat for Lalu, Tejashwi Yadav.

Web Summary : Bihar election results mirror 2010, with NDA triumphing over the Grand Alliance. Tejashwi Yadav faced setback, echoing Lalu Prasad Yadav's past defeat. NDA secured victory reminiscent of Nitish Kumar-led win.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा