घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar, PAN, Voter ID, Passport चे काय करावे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:40 PM2021-06-11T15:40:35+5:302021-06-11T16:40:59+5:30

Aadhaar, PAN, Voter ID, Passport after death: मृत व्यक्तीच्या वारसाला याची काहीच कल्पना नसते की, याचे काय करायचे? केव्हापर्यंत सोबत ठेवायचे की सरकारकडे जमा करायचे? चला जाणून घेऊयात...

What to do with Aadhaar, PAN, Voter ID, Passport in case of death of a family member? Find out ... | घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar, PAN, Voter ID, Passport चे काय करावे? जाणून घ्या...

घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar, PAN, Voter ID, Passport चे काय करावे? जाणून घ्या...

googlenewsNext

PAN Card, Aadhaar Card, Voter ID card, Passport, Driving License ही सारी सरकारी ओळखपत्रे आहेत जी वेळोवेळी उपयोगी पडतात. तुम्ही कधी विचार केलाय का की, मृत्यू नंतर त्या कार्डांचे काय होते. मृत व्यक्तीच्या वारसाला याची काहीच कल्पना नसते की, याचे काय करायचे? केव्हापर्यंत सोबत ठेवायचे की सरकारकडे जमा करायचे? चला जाणून घेऊयात... (What to do with Aadhaar, PAN, Voter ID, Passport in case of death)

Aadhaar: आधार नंबर तुमची ओळख, पत्ता आणि विविध योजनांच्या वापरासाठी कामाला येतो. मात्र, व्यक्तीच्या मृत्यूनंतर या आधार कार्डचा गैरवापर न होण्याची काळजी वारसांनी घ्यावी. UIDAI कडे हे आधारकार्ड रद्द करण्याची किंवा त्यावर मृत अशी नोंद करण्याची कोणतीही सोय नाहीय, असे सेबी रजिस्टर्ड गुंतवणून सल्लागार जितेंद्र सोळंकी यांनी सांगितले.

Voter ID Card: मतदान ओळखपत्राचे मात्र तसे नाहीय. निवडणूक आयोगाकडे फॉर्म नंबर 7 भरून मयत व्यक्तीचे ओळखपत्र रद्द करण्याची सोय आहे. यासाठी स्थानिक कार्यालयात मृत्यूपत्राची प्रत द्यावी लागणार आहे. 

PAN: पॅन कार्डचा वापर बँका, आयकर भरण्य़ासाठी वापरले जाते. मृताचा आयकरही त्या वर्षासाठी भरता येतो. हे खाते बंद होत नाही तोवर पॅन कार्ड गरजेचे आहे. आयकर विभाग जोवर भरलेला रिटर्न प्रोसेस करत नाही, तोवर हे पॅन कार्ड ठेवावे लागणार आहे. यानंतर बँक खाते वगैरे बंद करून हे पॅन कार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करावे. 

Passport: आधार कार्ड प्रमाणेच पासपोर्टमध्येही सरेंडर किंवा रद्द करण्याची सोय नाहीय. एकदा का पासपोर्टची व्हॅलिडिटी संपली की तो आपोआप रद्द होतो. हा पासपोर्ट मृत्यूनंतर वारसाने ठेवणे हे हुशारीचे ठरू शकते. कारण पुढे कोणत्याही कायदेशीर गोष्टींसाठी तो लागू शकतो. मृत्यू प्रमाणपत्रासह तो ठेवता येतो.
 

Read in English

Web Title: What to do with Aadhaar, PAN, Voter ID, Passport in case of death of a family member? Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.