शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

'छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 1:30 PM

येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. येडियुरप्पा यांच्या नाट्यमय राजीनाम्यावरुन प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. '56 इंचाच्या छातीचा अभिमान बाळगणाऱ्या मोदींना 55 तासही कर्नाटक सांभाळता आलं नाही,' अशी बोचरी टीका प्रकाश राज यांनी केली आहे.    कर्नाटकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडमोंडीनंतर भजापाला चांगलाच झटका बसला आहे. प्रकाश राज यांनी ट्विट करत मोदीवर निशाना साधला आहे. कर्नाटकचा रंग भगवा होणार नाही. तो रंगीबेरंगीच राहणार आहे. सामना सुरू होण्याआधीच संपला आहे. छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही त्यांना कर्नाटक राखता आलेलं नाही, असं प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकातील नागरिकांना आता पुढील गलिच्छ राजकारणासाठी तयार राहावं लागेल, असं सांगतानाच, मी यापुढंही जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहीन आणि प्रश्न विचारत राहीन, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Prakash Rajप्रकाश राज