शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून केंद्र अ‍ॅक्शन मोडवर, गृह मंत्रालयानं ममता सरकारला 3 दिवसांत मागितला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:43 IST

गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना संपूर्ण घटनेचा अहवाल 3 दिवसांत पाठवायला सांगितला आहे.

रामनवमी शोभायात्रेदरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता केंद्रातील मोदी सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ममता सरकारकडून रामनवमीच्या मुहुर्तावर झालेल्या दंगली आणि खराब कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात रिपोर्ट मागवला आहे. गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना संपूर्ण घटनेचा अहवाल 3 दिवसांत पाठवायला सांगितला आहे. बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे.

या पत्रानंतर गृह मंत्रालयाने हा अहवाल मागवला आहे. तत्पूर्वी, गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांच्यासोबत चर्चा करून गुरुवारी हावडा येथे रामनवमी शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. 

हावडा आणि हुगळीमध्ये झाला हिंसाचार -राज्यपालांनी अमित शहा यांना हिंसाचार आणि सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली आहे. हावडा येथे जमावाने मठ्या प्रमाणावर धुडगूस घातला, वाहने जाळली, दगडफेक केली आणि दुकानांचीही तोडफोड केली. यानंतर संबंधित भागांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांच्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. हावडानंतर रविवारी हुगळीत हिंसाचार उफाळून आला होता. 

सुकांत यांनी काय म्हटलंय पत्रात? -सुकांत मजुमदार यांनी आपल्या पत्रात लिहिले, हुगळी जिल्ह्यातही भाजपच्या मिरवणुकीतही गोंधळ घालण्यात आला.  यानंतर रेल्वे स्थानकांवर जोरदार दगडफेक झाली. यानंतर रेल्वे सेवा निलंबित करण्यात आली आणि हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसी आणि त्यांच्या समर्थनाशिवाय सुरू ठेवले जाऊ शकत नव्हते. याशिवाय, भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुकांत मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यातील हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांचीही भेट घेतली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी