शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच? संशयास्पद अवस्थेत आढळले भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:26 IST

पोलिसांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ता इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह एका खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे दोन्ही हात मागून बांधलेले होते. भाजप कार्यकर्ता इंद्रजीतचा मृतदेह जेथे सापडला ती इमारत बऱ्याच दिवसांपासून रिकामी पडून आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला तीन महिने होऊन गेले आहेत. तरीही येथील हिंसाचाराचा खेल सुरू आहे. आता राज्यातील दोन वेगवेगळ्या भागांत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मंगळवारी हे मृतदेह सापडल्यानंतर भाजपने टीएमसीवर आरोप केला आहे. की, टीएमसीचा आश्रय असलेल्या गुंडांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. तर दुसरीकडे टीएमसीने भाजपचे हे आरोप फेटाळले आहेत.

यासंदर्भात बोलताना पोलिसांनी म्हटले आहे, की भाजप कार्यकर्ता इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह एका खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याचे दोन्ही हात मागून बांधलेले होते. भाजप कार्यकर्ता इंद्रजीतचा मृतदेह जेथे सापडला ती इमारत बऱ्याच दिवसांपासून रिकामी पडून आहे.

बीरभूम जिल्ह्यातील खोइरासोल परिसरात मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली असून राजकीय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी म्हटले आहे, की इंद्रजित सूत्रधरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी हे खुनाचे प्रकरण असल्याचे दिसते. पण हत्या कशी झाली आणि कोणत्या परिस्थितीत झाली, हे चौकशीनंतरच कळेल. टीएमसीचा आश्रय असलेल्या गुन्हेगारांनीच त्यांची हत्या केल्याचे स्थानिक भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

बनावट सरकारी नोकरी घोटाळा; ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; दिला असा आदेश

यासंदर्भात, सूत्रधारच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तो सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होता. काही स्थानिक लोकांशी त्याचे वैयक्तिक भांडण असल्याचेही बोलले जात आहे.

याशिवाय, आणखी एक भाजप कार्यकर्ता 45 वर्षीय तपन खातुआ यांचा मृतदेह पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एगरा भागात असलेल्या एका तलावात सापडला. त्याच्या मृत्यूसाठी भाजप आणि खटुआच्या कुटुंबीयांनी टीएमसीलाच जबाबदार धरले आहे. टीएमसीच्या स्थानिक नेतृत्वाने हे आरोप फेटाळले आहेत. उलट, टीएमसी नेत्यांनी भाजपवर दुर्दैवी घटनांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत आदेश राखून ठेवला आहे-TMCचे म्हणणे आहे की, सूत्रधारची हत्या वैयक्तिक भांडणातून झाली, तर तपनने आत्महत्या केली. सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. पण एकाच दिवसात दोन मृतदेह सापडल्याने राजकीय तणाव वाढला आहे. आधीच भाजप आणि टीएमसीमधील संबंध चांगले नाहीत. दरम्यान, मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाने निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांची अंतिम सुनावणी घेतली आणि आदेश राखून ठेवला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिसMamata Banerjeeममता बॅनर्जी