West Bengal SSC Scam : अर्पितानंतर आता मोनालिसा दास! पार्थ यांच्या 7 आलिशान घरांवर करतात राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:15 IST2022-07-23T17:53:45+5:302022-07-23T18:15:30+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतनमधील फुलडांगा, भागात पार्थ चटर्जी यांची 7 घरे आहेत. सूत्रांनी दिदेल्या माहितीनुसार, या सर्व घरांची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास या करत होत्या.

West Bengal SSC Scam : अर्पितानंतर आता मोनालिसा दास! पार्थ यांच्या 7 आलिशान घरांवर करतात राज्य
पश्चिम बंगालमधील शिक्षक भर्ती घोटाळाप्रकरणी प्रवर्तन निदेशालय अर्थात ED ची कारवाई सुरू आहे. शुक्रवारी EDने ममता सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकून 21 कोटी रुपयांहून अधिकची रोकड जप्त केली. ED ने पार्थ चटर्जी यांच्या 14 ठिकानांवर छापे टाकले आहेत. अर्पिता यांच्या घरावरील छापेमारीनंतर आता मोनालिसा दास यांच्या घरावरही ED छापा टाकू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मोनालिसा या चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतनमधील फुलडांगा, भागात पार्थ चटर्जी यांची 7 घरे आहेत. सूत्रांनी दिदेल्या माहितीनुसार, या सर्व घरांची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास या करत होत्या. आता, पार्थ यांच्या अटकेनंतर, ED बिरभूममध्येही त्यांच्या घरांवर छापा टाकू शकते, असा अंदाज लावला जात आहे.
या भागातील लोकांचे म्हणणे आहे, की ही सर्व घरे पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांची आहेत आणि ते आधूनमधून येथे येत असतात. मात्र, अधिक काळ त्यांच्या या घराची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास याच करतात. तत्पूर्वी, ED ने मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक केली आहे. तर त्यांची एक जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांना ताब्यात घेतले आहे.
याशिवाय, सुकांत आचार्य यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरून 21 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. याशिवाय, 20 मोबाईल, मोठ्या प्रमाणावर सोनं-चांदी आणि परदेशी चलनही जब्त केले आहे. यानंतर ED ने छापेमारीचा वेग वाढवला आहे.