शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal result 2021: बंगाल निकालानंतर ममतांचा इशारा; संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 20:18 IST

West Bengal result 2021: ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जनतेला दिले. (Mamata Banerjee)

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील टीएमसीच्या शानदार प्रदर्शनानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेनतेला संबोधित करण्यासाठी समोर आल्या तेव्हा म्हणाल्या, त्यांना डबल सेन्च्यूरीची अपेक्षा होती. 221 जागांवर विजय होण्याची आशा होती. हा विजय बंगालच्या जनतेचा विजय आहे. आम्ही जल्लोश करणार नाही. एक छोटासा समारंभ करून पुन्हा कोरोनाच्या सामना करण्यासाठी मैदानात उतरू. (Mamata Banerjee says if whole country not get free vaccine than will protest)

बंगालच्या जनतेला मिळणार मोफत कोरोना लस - ममता बॅनर्जी यांनी यावेळी निवडणूक आयोगावर सहकार्य न केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा व्यवहार योग्य नव्हता. याच बरोबर, संपूर्ण राज्यातील जनतेला मोफत कोरोना लस देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी राज्यातील जनतेला दिले. 

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

देशातील लोकांना मोफत कोरोना लस दिली नाही तर आंदोलन -ममता बॅनर्जी म्हणाल्या, देशातील जनतेला मोफत कोरोना लस मिळाली नाही, तर आपण गांधी पुतळ्यासमोर पुन्हा आंदोलन करू. यावेळी, मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी टीएमसीकडून जनतेचे आभारही मानले. तसेच, कोरोनाच्या या कठीन काळातून बाहेर पडल्यानंतर आपण रॅली काढू, असेही ममता म्हणाल्या. तसेच आमचा शपथग्रहण समारंभ थोडक्यात होईल, यात कोरोनाचे नियमही पाळले जातील, असेही ममतांनी यावेळा सांगितले.

सत्तेत येताच ममता सरकार सर्वप्रथम काय करणार? -तृणमूलचे वरिष्ठ नेते तथा मावळे शहर विकास मंत्री फरहाद हकीम यांनी रविवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य स्थिती पुन्हा एकदा रुळावर आणण्यास नव्या सरकारचे प्राधान्य असेल, असे म्हटले आहे.

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

West Bengal Election Result 2021: जमीन हिलाने वाली जीत मुबारक दीदी, भारीच...; केजरिवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा

विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या