पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. परंतु त्यापूर्वी सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील मंत्री झाकिर हुसेन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हा हल्ला म्हणजे कट असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसंच यावेळी त्यांनी रेल्वे मंत्रालयावरही आरोप केले. तसंच रेल्वे मंत्रालय आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही त्या म्हणाल्या. जर रेल्वे स्थानकावर कोणावरही हल्ला झाला तर त्याच्यासाठी रेल्वे जबाबदार आहे. कारण याठिकाणी राज्याच्या पोलिसांकडे सुरक्षेचे अधिकार नाहीत, असंही त्या म्हणाल्या. "गेल्या काही महिन्यांपासून काही लोकं झाकिर हुसेन यांना आपल्या पक्षात येण्यासाठी दबाव टाकत आहेत. मी त्यांच्या नावाचा खुलासा करू इच्छित नाही," असंही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 14:09 IST
West Bengal : ममता बॅनर्जींनी साधला रेल्वेवर निशाणा, म्हणाल्या जबाबदारी झटकता येणार नाही
बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही
ठळक मुद्देममता बॅनर्जींनी साधला रेल्वेवर निशाणा, म्हणाल्या जबाबदारी झटकता येणार नाहीपश्चिम बंगालमधील मंत्र्यावर पेट्रोल बॉम्बनं करण्यात आला होता हल्ला