शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल निवडणूक: काल सीएम ममता तर आज स्मृती ईरानी दिसल्या स्कूटरवर, असा होता अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 22:39 IST

भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. (West bengal election)

सोनारपूर -पश्चिम बंगालच्या (West bengal) दक्षिण 24 परगना जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आज भाजप नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) रस्त्यावर उतरल्या. यावेळी स्मृती ईरानी यांनी स्कूटरवर बसून रॅलीचे नेतृत्व केले. भाजपच्या राज्यव्यापी ‘परिवर्तन यात्रे’त भाग घेत, गंगाजोआरा येथे स्मृती ईरानी यांनी भाजप खासदार रूपा गांगुली तसेच अग्निमित्रा पॉल यांच्यासह पक्षाच्या रथावर स्वार होऊन अभियानाची सुरुवात केली. काही वेळानंतर त्या रथातून उतरल्या आणि स्कूटरवर स्वार झाल्या. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचे हेल्मेट घातले होते आणि मास्कदेखील लावला होता.

VIDEO: ...इलेक्ट्रिक स्कूटी चलावताना पडता-पडता थोडक्यात बचावल्या ममता बॅनर्जी! सुरक्षा रक्षकांनी असं सावरलं

ईरानी म्हणाल्या, ''आज आम्ही रथयात्रा सुरू केल्यानंतर, प्रशासनाने जाणून बुजून उशीर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही दूचाकी वाहन चालवत जाऊ, पायी चालू कारण पश्चिम बंगाल बदलासाठी पुढे अग्रेसर झाला आहे.'' स्मृती ईरानी दूचाकीवर बसल्यानंतर उत्साहित झालेले अनेक भाजप कार्यकर्ते दूचाकीवर स्वार होऊन निघाले. यावेळी ''जय श्री राम'' तथा ''खेला होबे'' अशा घोषणांनी आकाश दणाणून गेले होते. खेला होबे ही घोषणा सर्वप्रथम तृणमूल काँग्रेसने दिली होती. ही घोषणा आता या निवडणूक काळात सामान्य झाली आहे.

स्मृती म्हणाल्या, ''मी तुमचे आभार मानते. आम्ही तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी बाहेर पडलो आहोत. आपण यापूर्वीच नरेंद्र मोदींना संधी दिली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान भाजप आणि कमळाला आशिर्वाद दिले आहेत.''

VIDEO : 'मंत्री चालवत होते स्कूटर, मागे बसल्या होत्या मुख्यमंत्री', पेट्रोल-डिझेल दरवाढीचा असाही विरोध!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात स्कूटरची सवारी केली होती -ईरानींच्या या बाइक रॅलीच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात स्कूटरची सवारी केली होती. त्या इलेक्ट्रिक स्कूटरवरून राज्य सचिवालय ‘नबान्न’ येथे गेल्या होत्या. ही स्कूटर राज्य सरकारमधील मंत्री आणि कोलकाता शहराचे मेयर फरहाद हकीम चालवत होते.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाElectionनिवडणूक