शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

West Bengal Election : "हल्ल्याबाबत ममता बॅनर्जी खोटं पसरवतायत"; भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:05 IST

West Bengal Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या पायाचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लास्टर घालण्यात आल्याचं एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्देबुधवारी ममता बॅनर्जींच्या पायाला झाली होती दुखापतत्यांच्या रुग्णालयात करण्यात आलं आहे दाखल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान पायाला आणि मानेला दुखापत झाली होती. दरम्यान, आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. यानंतर भाजपनंही प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी या राजकारणासाठी हल्ल्याचं खोटं वृत्त पसरवत असल्याचा आरोप केला. तसंच त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांचं एक शिष्टमंडळ कोलकात्यात निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं."गाडीजवळ असताना चार पाच लोकांनी मला धक्का दिला. माझ्या पायाला दुखापत झाली असून पायाला सूजही आली आहे. पायाला खुप दुखापत झाली आहे. मला तापही आला आहे. त्या ठिकाणी कोणतेही पोलीस उपस्थित नव्हते. चार पाच लोकांनी हे जाणूनबुजून केलं आहे. हे एक षडयंत्र आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. "आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालले्या हल्ल्याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. ममता बॅनर्जींवर हल्ला कसा झाला, कोणत्या परिस्थितीत झाला आणि कोणी केला याची माहिती मिळणं आवश्यक आहे," असं मत पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष प्रताप बॅनर्जी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. "मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उपस्थिती असून हा हल्ला कसा झाला याचा तपास झाला पाहिजे. ज्यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं याची मागणीही आम्ही करणार आहोत," असंही ते म्हणाले. असं काहीच घडलं नाहीममता यांना दुखापत झाली हे खरे असले तरी देखील ममता यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्यानं असे काही घडलेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ममता यांच्या पक्षाने तिथे ४-५ समाजकंटक होते. त्यांनीच ममता गाडीत बसत असताना दरवाजा ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्तरंजन दास नावाच्या तरुणानं तेथील घडलेला प्रकार सांगितला आहे. "मी घटनास्थळी होतो. मुख्यमंत्री त्यांच्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण दरवाजा उघडा होता. हा दरवाजा एका पोस्टरला आपटला आणि बंद झाला. कोणीही त्यांच्या कारचा दरवाजा ढकललेला नाही. दरवाजाकडे कोणीही उभं नव्हतं," असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री