शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

"मी भाजपविरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न करतेय, पण काँग्रेस...", ममता बॅनर्जींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 20:05 IST

Mamata Banerjee Speech : काही दिवसांपूर्वीच बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली.

Mamata Banerjee On Alliance : काही दिवसांपूर्वीच बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी विरोधकांकडून आघाडीचा प्रयोग केला जात आहे. पण या बैठकीच्या काही दिवसांनंतरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षावर टीका केली. केंद्रात भाजपच्या विरोधात मोठी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्या कृतीमुळे अडथळे निर्माण होत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांनी बिहारमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान एका रॅलीला संबोधित करताना म्हटले, "आम्ही केंद्रात भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु बंगालमध्ये काँग्रेस आणि सीपीआयएम भाजपला मदत होईल असे काम करत आहे."

कॉंग्रेसचे प्रत्युत्तर दरम्यान, मागील १० दिवसांत दुसऱ्यांदा असे झाले आहे की, ममता बॅनर्जी यांनी भाजपशी गुप्त करार केल्यावरून काँग्रेस आणि सीपीआयएमवर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, "भाजपविरुद्धच्या लढाईत टीएमसीच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. भाजपविरुद्धच्या लढाईत टीएमसीने एवढ्या वर्षात काय भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहिती आहे."   या प्रकरणी बोलताना भाजपने राज्यातील सीपीआयएम आणि काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारचा करार केला नसल्याचे म्हटले. सीपीआय (एम), काँग्रेस आणि टीएमसी ही एकच 'बोट' असल्याची टीका भाजप नेते राहुल सिन्हा यांनी केली. 

टॅग्स :BiharबिहारMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाBJPभाजपा