Lata Mangeshkar: पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लता दीदींची गाणी वाजणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 17:24 IST2022-02-06T17:23:17+5:302022-02-06T17:24:51+5:30
Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Lata Mangeshkar: पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लता दीदींची गाणी वाजणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा!
Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी पुढील १५ दिवस लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी वाजणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लता दीदींनी संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनोखी मानवंदना देण्याच्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच कार्यालयं, कार्यालयांच्या लिफ्ट, ट्राफिक सिग्नल अशा ठिकाणी लता मंगेशकर यांची गाणी लावली जाणार आहेत. तसंच पश्चिम बंगालमध्ये उद्याचा सर्व शासकीय कार्यालयांना 'हाफ डे' जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयं उद्या अर्धा दिवसच कामकाज केलं जाणार आहे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee announced to play songs of Bharat Ratna Lata Mangeshkar at every public spot, govt installation and traffic signals for the next 15 days.
— ANI (@ANI) February 6, 2022
केंद्राकडून दोन दिवसांचा दुखवटा
लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून याआधीच दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व शासकीय कार्यालयं, मंत्रालय आणि संसदेवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.
महाराष्ट्रात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर
लता मंगेशकर यांच्या निधानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याअंतर्गत शासकीय कार्यालयांसोबतच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद राहणार आहेत.