भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:38 IST2026-04-12T09:38:20+5:302026-04-12T09:38:44+5:30

West Bengal Assembly Election 2026: भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आला तर तृणमूल काँग्रेसचे ‘सिंडिकेट राज’ संपवेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे एका जाहीर सभेत केला. राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

West Bengal Assembly Election 2026: BJP government will end 'syndicate raj' in Bengal, assures Amit Shah | भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन

भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन

ओंडा (पश्चिम बंगाल)  - भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आला तर तृणमूल काँग्रेसचे ‘सिंडिकेट राज’ संपवेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे एका जाहीर सभेत केला. राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बांकुरा जिल्ह्यातील ओंडा येथे सभेत शाह यांनी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा म्हणून त्यांचा माल देशभरात पाठवला जाईल, असे आश्वासन दिले. ‘डायमंड क्वीन’ला बाय बाय करण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले.

रे यांच्या चित्रपटाचा संदर्भ
शाह यांनी ऑस्कर-विजेते चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या १९८०च्या ‘हिरक राजार देशे’ या चित्रपटाचा संदर्भ दिला. हा चित्रपट आपल्या विरोधकांवर आणि प्रजेवर अत्याचार करणाऱ्या एका हुकूमशहा  राजाची कथा सांगतो, असे ते म्हणाले.

Web Title : भाजपा बंगाल में सिंडिकेट राज खत्म करेगी: अमित शाह का आश्वासन

Web Summary : अमित शाह ने भाजपा के जीतने पर बंगाल में तृणमूल के 'सिंडिकेट राज' को खत्म करने का वादा किया। उन्होंने महिलाओं के लिए न्याय, बेहतर आलू की कीमतों का आश्वासन दिया और सत्यजित रे की फिल्म का जिक्र किया जो अत्याचारी शासकों के बारे में है। उन्होंने कहा कि 'डायमंड क्वीन' को अलविदा कहने का समय आ गया है।

Web Title : BJP will end syndicate rule in Bengal: Amit Shah assures

Web Summary : Amit Shah promised to end Trinamool's 'syndicate raj' in West Bengal if BJP wins. He assured justice for women, better potato prices, and referenced Satyajit Ray's film about oppressive rulers. He signaled it was time to say goodbye to the 'Diamond Queen'.