शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

आयुध निर्माण कारखान्यांचे कर्मचारी जाणार संपावर; ४ ऑगस्टपासून देशव्यापी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:17 PM

संरक्षण मंत्रालयाने खासगी कंपन्यांकडून संरक्षण उत्पादनाच्या निविदा मागवल्याने नाराजी.

ठळक मुद्देकॉर्पोरेटायझेशनच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची फसवणूक

पुणे : संरक्षण मंत्रालयाने खासगी कंपन्यांकडून संरक्षण उत्पादनाच्या निविदा मागविल्या आहेत. याबाबत नाराजी व्यक्त करत देशातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या कर्मचारी संघटनांकडून चार आॅगस्ट रोजी ‘धरणे आंदोलन’ केले जाणार आहे.एकीकडे देशातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या चर्चा करत असल्याचे भासवायचे आणि दुसरीकडे खासगी कंपन्यांकडून निविदा मागवायच्या, असे दुटप्पी धोरण देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून अवलंबले जात आहे, असा आरोप करत दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या कर्मचारी संघटनांनी संरक्षण मंत्रालयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.देशातील आयुध निर्माण कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन करण्यासाठी सरकारने घोषणा केली होती. याबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून खासगी मॅनेजमेंट कन्सल्टन्सिकडून निविदा मागवल्या होत्या. या निविदा मागवणे ही संरक्षण क्षेत्रातील कामगारांची घोर फसवणूक असून, याविरोधात संपावर जाण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली होती. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाच्या या भूमिकेविरोधात आवाज उठविण्यासाठी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, आॅल इंडिया डिफेन्स इम्प्लॉयी फेडरेशन आणि इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन या तीन संघटनांकडून ४ आॅगस्ट रोजी देशभरातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखान्यांच्या आवारात धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या संघटनेचे पुण्यातील अध्यक्ष संजय  मेनकुदळे  यांनी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानStrikeसंपEmployeeकर्मचारी